Home /News /news /

आरोग्य आणि जीवन विमा घ्यायचा आहे? पॉलिसी घेण्यापूर्वी या घटकांची पडताळणी आवश्यक

आरोग्य आणि जीवन विमा घ्यायचा आहे? पॉलिसी घेण्यापूर्वी या घटकांची पडताळणी आवश्यक

कोरोना काळात (Corona Virus Pandemic) आरोग्य (Health Insurance) आणि आयुर्विम्याचे (Life Insurance) महत्त्व अधिकच ठळकपणे जाणवले आहे.

    मुंबई, 23 डिसेंबर: आजकालच्या धकाधकीच्या काळात आरोग्याच्या तक्रारी लहान वयातच वाढू लागल्या आहेत. अनेक गंभीर आजार लहान वयातच होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळं उत्पन्न किंवा बचत कमी असण्याच्या काळात असे काही गंभीर आजार झाले तर उपचारांचा खर्च पेलणं अनेकांना कठीण जातं. अनेकांचे उत्पन्नही कमी असते, त्यामुळे मोठ्या खर्चाचे उपचार करताना अनेकांना अडचण येते. अशावेळी योग्य आरोग्य विमा (Health Insurance) असणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आयुर्विमा (Life Insurance) उपयुक्त असतो. मात्र आयुर्विमा किती आणि कधी घ्यावा, याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. अनेकदा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितले म्हणून ती पॉलिसी घेतली जाते, पण आपल्या वयानुसार आणि भविष्यातील गरजांचा विचार करून ही गुंतवणूक करणे आवश्यक असते. कोरोना काळात (Corona Virus Pandemic) आरोग्य आणि आयुर्विम्याचे महत्त्व अधिकच ठळकपणे जाणवले आहे. CNBC TV18 ने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार आयुर्विमा आणि आरोग्य विमा याबाबत मार्गदर्शन करताना प्रोबस इन्शूरन्स (Probus Insurance) आणि इन्श्यूरटेक ब्रोकिंग कंपनीचे (Insurtech Broking Company) संचालक राकेश गोयल (Rakesh Goyal) म्हणाले, आरोग्य विमा घेताना प्रीमियम्स आणि फायदे यांचा तुलनात्मक अभ्यास करणं महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने वैयक्तिक आणि कुटुंबाची आर्थिक गरज याचा विचार करून पॉलिसी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना गंभीर आजार असेल, अशावेळी वैयक्तिक आणि कुटुंबाच्या गरजांचा विचार करून तेवढ्या कव्हरची पॉलिसी घेणं योग्य ठरतं. या परिस्थितीत अशा कुटुंबासाठी 5-10 लाखाचे कव्हर पुरेसे नाही. Taxpayers 9 दिवसांत भरा ITR; जाणून घ्या Income Tax Return फाइल करण्याबाबत आरोग्य विमा घेताना पॉलिसीतील मर्यादा, क्लेम सेटलमेंट रेशो, प्रीमियम लोडिंग, कॅशलेस उपचारांची सुविधा देणारी उपलब्ध हॉस्पिटल्स याची माहिती घेऊन आपली गरज, सोय आणि बजेट या सर्वांचा ताळमेळ घालून योग्य पॉलिसी घेणं आवश्यक आहे. तसंच ठराविक वयानंतर पॉलिसी रिन्यू होण्याची सोय असेल तर तेही महत्त्वाचे ठरते. त्याचाही विचार पॉलिसी घेताना केला पाहिजे, असंही गोयल यांनी सांगितलं. त्याशिवाय इन्शूअर्ड रकमेत वाढ करण्याची सोय, अॅड ऑन रायडर्स, प्री एक्झीस्टिंग आजारांसाठी वेटिंग पिरीयडची सुविधा याही बाबींचा विचार करून आपण ज्या कंपनीची पॉलिसी घेत आहोत, त्याबाबत रिव्ह्यू जाणून घेणंही आवश्यक आहे, याकडेही गोयल यांनी लक्ष वेधलं. एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनीनुसार(HDFC Ergo Insurance Company), आरोग्य विमा घेताना, तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 50 टक्के रकमेची पॉलिसी घेणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये किमान कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (coronary artery bypass graft) तुमच्या सवडीनुसार असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये होईल अशी सोय असणं गरजेचं आहे. 'वजनदार' व्यक्तींनो सावध राहा! लठ्ठपणामुळे आता संसर्गजन्य आजारांचाही धोका आयुर्विमा घेताना प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. काहीजण भविष्याची तरतूद म्हणून गुंतवणूक करतात, काहीजण मुलांचं शिक्षण, लग्न यासाठी तर काहीजण निवृत्तीनंतरची तरतूद म्हणून आयुर्विमा घेतात. त्यामुळं आयुर्विमा घेताना, क्लेम सेटलमेंट रेशो, रायडर्स यांची माहिती घेण्यासह इतर योजनांबरोबर तुलना करून नीट अभ्यास करून निर्णय घ्यावा, असा सल्ला गोयल यांनी दिला आहे. आयुर्विमा घेताना आपली आर्थिक गरज आणि आपल्याला त्याचा हप्ता परवडतो का याचा विचार करणं महत्त्वाचं आहे, असा सल्ला आयआरडीएआय (IRDAI) देते. तुमच्या वार्षिक वेतनाच्या सहा ते दहापट रक्कमेची पॉलिसी घ्यावी, असं विमा कंपन्या सुचवतात. आयुर्विमा किती रकमेचा घ्यावा, याचे गणित मांडायचा दुसरा एक मार्ग म्हणजे, तुमच्या वार्षिक वेतनाच्या रकमेला तुमची निवृत्तीपर्यंतच्या नोकरीच्या कालावधीच्या आकड्याने गुणावे, येणाऱ्या उत्तराइतक्या रकमेची पॉलिसी घ्यावी, असंही काही तज्ज्ञ सुचवतात.
    First published:

    Tags: Insurance

    पुढील बातम्या