Home /News /lifestyle /

'वजनदार' व्यक्तींनो सावध राहा! लठ्ठपणामुळे आता संसर्गजन्य आजारांचाही धोका

'वजनदार' व्यक्तींनो सावध राहा! लठ्ठपणामुळे आता संसर्गजन्य आजारांचाही धोका

लठ्ठ (obese) व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यांना सहजासहजी त्या विषाणूला परतवून लावता येत नाही.

    मुंबई, 23 डिसेंबर : शारीरिक स्थूलता (obesity) किंवा वजन (weight) प्रमाणापेक्षा जास्त असल्यास विविध जीवनशैलीशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झालेले आहे. पण आता लठ्ठपणामुळे कोरोनाचा धोकाही वाढतो आहे. 2020 या वर्षात कोविड-19 या व्हायरसचा सर्वांधिक धोका हा लठ्ठ व्यक्तींना जास्त असल्याचे विविध अहवालावरून समोर आले आहे. आतापर्यंत जितके कोरोना रूग्ण आढळून आले आहेत त्यातील अधिकतर रुग्ण हे लठ्ठ होते. पण वेळीच आजाराचे योग्य निदान आणि उपचार न झाल्यास लठ्ठपणामुळे जोखीम वाढण्याची शक्यता असते. लठ्ठ व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यांना सहजासहजी त्या विषाणूला परतवून लावता येत नाही. अतिलठ्ठ व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्यास गुंतागुंत अधिकच वाढू शकते, असं सैफी आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितलं. स्थूलतेमुळे टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा रोग, आणि रक्त गोठणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय फुफ्फुसावरही लठ्ठपणामुळे परिणाम होतो. तसंच लठ्ठ व्यक्तीच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी शक्ती नसल्याने आजार वाढू शकतो. अशा स्थितीत बऱ्याच रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार द्यावे लागतात. हे वाचा - सावधान! कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचवणारा हँड सॅनिटायझर लहान मुलांसाठी धोकादायक त्यामुळे कुठल्याही व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आपले वजन कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल.  तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बॉडी माय इंडेक्स (बीएमआय) तपासून घेणं गरजेचं आहे. बॉडी माय इंडेक्स (बीएमआय) कसं तपासलं पाहिजे? प्रत्येक व्यक्तीची उंची आणि वजन यामुळे बॉडी माय इंडेक्स (बीएमआय) ठरवला जातो. यात बीएमआयनुसार 18.5 आणि 23.5 च्या दरम्यान असलेल्या व्यक्तीचं वजन सामान्य असतं. 18.5 पेक्षा कमी BMI = कमी वजनाचे बीएमआय  18.5 – 23.5 = सामान्य वजन बीएमआय 23.5 - 27.5 = जास्त वजन बीएमआय 23.5 – 32.5 = लठ्ठपणाच्या खाली बीएमआय 32.5 -37.5 = लठ्ठपणा बीएमआय 37.5  पेक्षा जास्त = अतिलठ्ठ हे वाचा - 'नवा CORONA अधिक संसर्गजन्य पण...', केंद्र सरकारनं दिली नवी माहिती लठ्ठपणा ही अशी अवस्था आहे ज्यात शरीरातील अन्य अवयवांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. पौष्टिक आहार न घेणं, अपुरी झोप, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणा वाढीस लावणारी चार प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे तणाव कमी व्हावा, यासाठी दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. तसंच दररोज संतुलित आहार घ्यावा. लठ्ठपणा हा एक आजार असून तो अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी बेरिअॅट्रिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे. टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग आणि पीसीओएस, फुफ्फुसाशी संबंधित आजार आणि यकृत रोग यांसारख्या अनेक संबंधित आजारांचे मूळ कारण लठ्ठपणा आहे. मुळात लठ्ठपणा कमी करून घेण्यासाठी बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया हा एकमेव प्रभावी पर्याय आहे, असा सल्ला डॉ. अपर्णा यांनी दिला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Obesity

    पुढील बातम्या