आई समान सासूला जावयाने कायमचं संपवलं, डोक्यात लाकडी ओंडका घालून घेतला जीव

आई समान सासूला जावयाने कायमचं संपवलं, डोक्यात लाकडी ओंडका घालून घेतला जीव

जावयाने सासूची हत्या केली असल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी पहाटेच्या सूमारास हा प्रकार घडला आहे.

  • Share this:

सांगली, 06 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशात सांगलीमध्ये हत्येचा भयंकर प्रकार समोर आला आहे. जावयाने सासूची हत्या केली असल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी पहाटेच्या सूमारास हा प्रकार घडला आहे. खरंतर, सासू मग ही मुलीची सासू असो किंवा मुलाची ती आपल्या आई समान असते. पण अशात सासूची जावयाने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी माहेराहून परत येत नसल्यामुळे रागाच्या भरात पती घरी गेला आणि त्यांच्यात यावरून मोठा वाद सुरू झाला. दोघांचंही भांडण सुरू होताच सासू वाद मिटवण्यासाठी मध्ये पडली असता जावयाने लाकडी ओंडका तिच्या डोक्यात घातला आणि बेदम मारहाण केली. यामध्ये सासूचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, असा पार पडणार पहिला दिवस

सांगलीतील वाळवा तालुक्यातील कारंदवाडी शनिवारी पहाटे हा धक्कादायक प्रकार घडला. शालन रामचंद्र पाटील असं मृत्यू झालेल्या सासूचं नाव आहे तर कृष्णा खापरे असं आरोपी जावयाचं नाव आहे. पोलिसांनी कृष्णा याला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा धोका वाढला, सांगली जिल्ह्यातील 2 आमदारांना झाली लागण

पती आणि पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे पत्नी ही गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी राहत होती. यावर पतीने बोलावूनही ती सासरी गेली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि यात मृत्यू मात्र सासूचा झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला. यानंतर शालन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 6, 2020, 8:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या