शिकागो,ता,19 जून : जन्म आणि मृत्यू कुणीच सांगू शकत नाही असं म्हणतात पण 'गुगल' आता पेशंटच्या मृत्यूची तारिख सांगू शकेल असं सॉफ्टवेअर विकसित करत आहे. गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेट एक संशोधन प्रकल्प राबवत आहे. याबाबतचा एक प्रयोग गुगने यशस्वी केला असून त्याचा रिपोर्ट 'नेचर' मासिक प्रसिद्ध झाला आहे. गुगलच्या या संशोधनाला यश मिळालं तर ती विज्ञानाची आणखी एक मोठी क्रांती ठरणार आहे.
गुगलची एक मेडिकल 'ब्रेन टीम' आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या साह्यानं एक खास सॉफ्टवेअर विकसित करत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये पेशंटची सर्व बारिक सारिक माहिती टाकली जाते. पेशंटच्या मेडिकल टेस्ट, त्याचा आजारपणाचा इतिहास, डॉक्टरांचं ओपिनियन अशी सर्व माहिती टाकल्यानंतर गुगल विश्लेषण करून त्या पेशंटच्या मृत्यूचा कालावधी काय असेल त्याचा अंदाज बाधते.
याचा प्रयोग एका कॅन्सरग्रस्त महिलेवर करण्यात आला. ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत असलेल्या या महिलेवर उपचार सुरू असताना हा प्रयोग करण्यात आला. दोन तज्ञ डॉक्टरांच्या टीमन या महिलेवर उपचार केले होते. त्या डॉक्टरांचं मत आणि सर्व माहिती या सॉफ्टवेअरमध्ये टाकण्यात आली होती.
त्यानंतर गुगलनं त्या माहितीं विश्लेषण करून त्या महिलेची जगण्याची शक्यता 19.9 टक्के असल्याचं सांगितलं आणि काही दिवसातच त्या महिलेचा मृत्यू झाला.
या संशोधन प्रकल्पात अनेक भारतीयांचाही समावेश आहे.
स्टॅनफोर्ड युनव्हर्सिटीच्या मदतीनं गुगल हा प्रकल्प राबवत आहे. अजुनही प्राथर्मिक अवस्थेत हा प्रयोग असून अधिक संशोधनानंतर त्याचा पूर्ण वापर करता येणार असल्याचं गुगलच्या एआय विभागाचे प्रमुख जेफ डेन यांनी सांगितलं.
या सॉफ्टवेअरचा वापर करताना अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे.
याचा दुरूपयोग झाला तर नवे प्रश्न निर्माण होतील अशी टीकाही या संशोधनावर करण्यात येत आहे. मात्र गुगल असा दुरूपयोग कधीही होऊ देणार नाही असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा...
दिल्लीत अधिकारी कामावर, 'आप'चं ठिय्या आंदोलन मागे
जम्मू-काश्मीरमधल्या सरकारचा पाठिंबा भाजपनं काढला
सरकार बनवायला कुणालाही पाठिंबा देणार नाही, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं केलं स्पष्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AI predictor, Computer, Death, Google, Nature system, Patients