सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाने उचललं पाऊल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाने उचललं पाऊल

देशातील विविध तुरुंगामध्ये गर्दी असल्याने कैद्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे

  • Share this:

अहमदाबाद, 17 मे : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने गुजरातमधील (Gujrat) तुरुंगांमधून आतापर्यंत तब्बल 2500 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कैद्यांनी पॅरोल, अंतर्गत जामीन आणि काही काळासाठी सुटका करण्यात आली आहे. यामुळे तुरुंगातील गर्दी कमी होऊन कैद्यांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात येईल आणि कैद्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही.

अतिरिक्त पोलीस महानिर्देशक (तुरुंग) एल.एन.राव यांनी सांगितले की, राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात तब्बल 1400 कैदी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आम्ही आतापर्यंत 2500 कैद्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यापैकी तब्बल 1000 जणांना अंतर्गत जामीन, 800 पॅरोल आणि 700 जणांना काही काळासाठी सोडण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार 7 वर्षांपर्यंत तुरुंगात राहिलेल्या कैद्यांना पॅरोल वा अंतर्गत जामीनावर सुटका करण्याचा विचार केला जावा, यामुळे कोविडचा प्रकोप पाहता तुरुंगात कमीत कमी गर्दी राहिल. महाराष्ट्रातील अनेक तुरुंगामध्ये कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विविध राज्यांनी हा परिणाम रोखण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra) सरकारनेही लॉकडाऊन कालावधी 31 मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने 17 मे रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र शासनाने आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत लॉकडाऊन कालावधी 17 मेपर्यंत वाढवला होता. हा कालावधी आज संपला असून आता पुढे लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे.

संबंधित -2 श्रमिक ट्रेन रद्द झाल्याने मजुरांचा आक्रोश; पोलिसांवर दगडफेक

कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्र आणि पंजाबनंतर आता या राज्यानेही वाढवला लॉकडाऊन

First published: May 17, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या