जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / हाडांची पावडर, मांसाची बिर्याणी, गर्लफ्रेंडने रुममध्ये असं केलं की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही!

हाडांची पावडर, मांसाची बिर्याणी, गर्लफ्रेंडने रुममध्ये असं केलं की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही!

हाडांची पावडर, मांसाची बिर्याणी, गर्लफ्रेंडने रुममध्ये असं केलं की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही!

30 वर्षांची तरुणी एका तरुणासोबत 7 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये जे घडलं, त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

  • -MIN READ International
  • Last Updated :

यूएई, 28 जानेवारी : बिर्याणी नावाने तोंडाला पाणी सुटते. पण तुम्ही खात असलेल्या चवदार बिर्याणीमध्ये मानवी मांस मिसळले आहे, हे कळले तर तुम्हाला कसे वाटेल? मात्र, हो हे खरे आहे. असे काही लोकांसोबत घडले आहे. युएईमध्ये काही लोकांनी ज्या बिर्याणीला आनंदाने खाल्ले त्यामध्ये मात्र, एका मुलाच्या मृतदेहाचे छोटे तुकडे मिसळले होते. 30 वर्षांची तरुणी युएईमध्ये एका तरुणासोबत 7 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघांमध्ये खूप प्रेम होते, पण काही काळापासून मुलाने तिच्यापासून दुरावा निर्माण करायला सुरुवात केली होती. तरुणीने यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तिला हादराच बसला. युएईमध्येच या तरुणीच्या प्रियकराचे दुसऱ्याच मुलीशी प्रेमसंबंध होते. जेव्हा तिने आपल्या प्रियकराशी याबाबत चर्चा केली. तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर तो या तरुणीपासून वेगळा राहू लागला. याप्रकारामुळे ही तरुणी फार तणावात आली होती. त्यामुळे काही दिवसांनंतर तिने आपल्या माजी प्रियकराला तिच्या घरी जेवायला बोलावले. येथे ती एकटी राहायची. यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि तिने तिच्या माजी प्रियकराची चाकूने वार करून हत्या केली. यानंतर ती अपार्टमेंटमध्ये मृतदेहासोबत एकटी होती. घरात रक्ताचा सडा होता. यानंतर तरुणीने मृतदेहासोबत अशीच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीही ती घराचा दरवाजा आतमधून बंद करून मृतदेहासोबत बसली होती. याचदरम्यान, तिच्या मोबाईलवर तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला. हाय, मी तुला भेटायला तुझ्या घरी येतेय! असे तिने म्हटले. हे ऐकून आरोपी तरुणीचे धक्काच बसला. तिने तिला नकार दिला पण तरीसुद्धा तिने ऐकले नाही. थोड्या वेळानंतर तिची मैत्रीण तिथे आली. मात्र, तोपर्यंत तिने घराची साफसफाई केली होती. रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला होता. तसेच प्रियकराच्या मृतदेहाला स्टोअर रुममध्ये ठेवले होते. तिची मैत्रीण आल्यावर दोन्ही जणी कॉफी प्यायल्या. दोघांनी गप्पा केल्या. काहीच झालेले नाही अशी ती वागत होती. यानंतर तिची मैत्रीण परत निघून गेली. यानंतर आरोपी तरुणीसुद्धा आपल्या दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये निघून गेली. यानंतर तिने मार्केटमध्ये जाऊन काही मोठी भांडी, मोठा चाकू, करवत, प्रेशर कुकर, मीट ग्राइंडर आणि गॅस विकत घेतला. हे सर्व सामान घेऊन ती तिच्या अपार्टमेंटमध्ये परतली. यानंतर तिने करवतीच्या मदतीने तिच्या प्रियकराच्या मृतदेहाचे छोटे तुकडे केले. यानंतर मृतदेहाचे तुकडे मोठमोठ्या भांड्यांमध्ये ठेवून त्यात पाणी टाकून ते अनेक तास गॅसवर शिजवले. जेव्हा मांस शिजवल्यानंतर हाडांपासून ते वेगळे होऊ लागते तेव्हा तिने हाडे वेगळ्या भांड्यात काढून मिक्सरमध्ये टाकून ते अगदी बारीक करुन घेतले. यानतर तिने आपल्या प्रियकराचे मांस प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यासाठी तांदळासोबत टाकले. त्याशिवाय, तिने बिर्याणी मसाला आणि इतर मसाले घालून चव वाढवण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणीने याचप्रकारे चार दिवस अपार्टमेंटमध्ये मृतदेहाची अशाप्रकारे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत राहिली. तिने आधी हाडे ओव्हनमध्ये भाजले आणि नंतर ती हाडे ग्राइंडरमध्ये बारीक करून पावडर बनवली. यानंतर तिने ही भुकटी वेगवेगळ्या नाल्यांमध्ये वाहून टाकली. त्यानंतर, तांदूळ आणि मानवी मांसासह तयार केलेली बिर्याणी जवळपासच्या बांधकामात काम करणाऱ्या पाकिस्तानी मजुरांमध्ये वाटली जाते. हेही वाचा -  मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अफेयर, समजावूनही महिलेने ऐकले नाही, पतीने तिचा विषयच संपवला! या मुलीने तिच्या प्रियकराचे सर्व पुरावे नष्ट केले होते. तर मजदूरांनी मृतदेहाच्या तुकड्यांची बिर्याणी खाल्ली होती. हाडांची भुकटी नाल्यात वाहून टाकली होती. रक्ताचे डागही पुसून टाकले होते. तसेच सर्व कागदपत्रे आणि मोबाईलही तिने जाळून टाकला होता. तिला असे वाटले होते की, तिला आता कोणी काहीच करू शकत नाही. मात्र, अनेक दिवस हा तरुण त्याच्या कुटुंबाकडे परत न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ही तरुणी आणि तिचा प्रियकर अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे पोलिसांनी सर्वप्रथम या तरुणीची चौकशी केली. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला. हा मुलगा कुठे गेला याचा पुरावाही पोलिसांकडे नव्हता. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता पोलिसांना एक धक्कादायक बाब समोर आली. शेजाऱ्यांनी सांगितले की, चार दिवसांपासून मुलीच्या अपार्टमेंटमधून अत्यंत दुर्गंधी येत होती, मात्र, अद्याप पोलिसांकडे याचा पुरावा नाही. यानंतर या तरुणीच्या घराची झडती घेतली, मात्र काहीही मिळाले नाही. पोलिसांनी ती नवीन भांडी आणि ब्लेंडर पाहिल्यावर पोलिसांनी ते तपासले. यावेळी मात्र, पोलिसांना येथे पुरावे मिळाले. मुलाचा एक दात मांस ग्राइंडरमध्ये अडकला होता, जो मुलीला दिसत नव्हता. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. ही घटना 2018 सालची आहे. ही तरुणी मोरोक्कोची असून ती अनेक वर्षांपासून यूएईमध्ये राहात होती. या घटनेनंतर तरुणीला अटक करण्यात आली आणि त्यानंतर तिने स्वतः त्या चार दिवसांची संपूर्ण कहाणी सांगितली. प्रियकराची बिर्याणी बनवणाऱ्या या तरुणीने अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने सांगितले की, तिला त्या तरुणाशी लग्न करायचे होते. पण जेव्हा त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे ठरवले तेव्हा तिने रागाच्या भरात त्या मुलाची हत्या केली. यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी तिने हा अत्यंत भयानक कट आखल्याचे तिने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात