गौरी लंकेश प्रकरण : 50 मारेकऱ्यांच्या निशाण्यावर राज्यातील 26 व्यक्ती !

गौरी लंकेश प्रकरण : 50 मारेकऱ्यांच्या निशाण्यावर राज्यातील 26 व्यक्ती !

डायरीमध्ये ज्या व्यक्तींची नाव आहे त्यामध्ये सर्वाधिक नावं ही महाराष्ट्रातील होती. तर कर्नाटकमधील 10 लोकांची नावं आहे.

  • Share this:

कर्नाटक, 30 जून : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयीत अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती समोर आलीये. गौरी लंकेश यांच्या शिवाय आणखी 36 व्यक्ती मारेकऱ्यांच्या निशाण्यावर होती. यातील सर्वाधिक नावं ही महाराष्ट्रातील होती.

सुत्रांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार, डायरीमध्ये ज्या व्यक्तींची नाव आहे त्यामध्ये सर्वाधिक नावं ही महाराष्ट्रातील होती. तर कर्नाटकमधील 10 लोकांची नावं आहे. कर्नाटकमधील जी नावं समोर आली त्यांना 'हिंदू विरोधी' म्हणून उल्लेख करण्यात आलाय.

या डायरीत सांकेतिक भाषेचा अधिक वापर करण्यात आलाय. 36 लोकांच्या हत्येसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून 50 शुटर्स निवडण्यात आले होते.  त्यामध्ये काही बेळगाव, हुबळी आणि पुण्यामध्ये बंदूक, पिस्तुल एअर गन आणि पेट्रोल बाॅम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण सुरू होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या संमेलनात कोण अधिक धाडसी आहे यावरून मारेकऱ्याची निवड करण्यात येत होती.

परशुराम वाघमारे याच्यावर गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडण्याचा आरोप आहे. परशुरामची निवड ही 2012 मध्ये विजयपुरा जिल्ह्यातील गृहनगरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी पाकिस्तानी झेंडा फडकावला होता. त्यांचं हे धाडस पाहुन त्यांची निवड करण्यात आली होती.

हत्येच्या आधी वाघमारेला जेवण आणि बसच्या भाड्यासाठी 3000 रुपये देण्यात आले होते आणि हत्या झाल्यावर 'चांगल्या कामासाठी' 10 रुपये देण्यात आले होते.

5 सप्टेंबर 2017 रोजी दोन दुचाकीस्वारांनी गौरी लंकेश यांची हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केलीये तर तीन संशयितांची चौकशी करत आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही?,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी

धर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

आयकर विभागाने सुरू केली नवीन पॅनकार्ड सुविधा,ही कामं होतील मोफत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 10:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading