नवी दिल्ली, 30 जून : आयकर विभागाने ऑनलाईन इन्स्टंट पॅनची सुविधा सुरू केली आहे. फक्त आपल्याला आयकर विभाग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि आपले वैध आधार तपशील भरावे लागेल. आता घरी बसून तुम्ही तुमचे स्वतःचे पॅन तयार करू शकता. आयकर विभागाने आता ऑनलाईन इन्स्टंट पॅनची सुविधा सुरू केली आहे. फक्त आपल्याला आयकर विभाग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि आपले वैध आधार तपशील भरावे लागेल. यासाठी कसल्याच प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता नसणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, आयकर विभागाची ई-पॅन सुविधा ही फक्त काही कालावधीसाठीच असणार आहे. ‘पहले आओ, पहले पाओ’ या आधारावर ही योजना लागू करण्यात आलेली आहे. याबद्दल जाणून घ्या… >> आता तुम्ही तुमचे आधार दुरूस्त करून ठेवा कारण त्याआधारावरच ई-केवायसी प्रक्रिया होणार आहे. >> त्यानंतर आपण साईन पेपरवर स्वाक्षरी करून तो अपलोड करावा. >> अर्ज फाईल होताच 15 अंकी एक एनक्लोजमेंट नंबर जेनरेट होईल. >> ही सुविधा एकदम मोफत असून फक्त वैयक्तिक करदात्यांसाठी आहे. >> एचयूएफ, फर्म, ट्रस्ट आणि कंपन्या मात्र ई-पॅन तयार करू शकणार नाहीत. पॅन कार्ड हे आधारशी जोडणे आवश्यक जर तुम्ही आतापर्यंत तुमचा पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेला नसेल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅन कार्डला आधारशी जोडण्यासाठी 30 जून ही शेवटची तारीख निश्चित केली आहे. सीबीडीटी पॅनला आधार जोडण्याची तारीख चार वेळा वाढली होती. ऑनलाइन रिटर्न दाखल करताना आता प्रथम पॅनला आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे. सरकारने पॅनसोबत आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. हेही वाचा मुंबई - पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने पत्नीला 50 लाखांना लुटले! तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या …अन्यथा 16 जुलैपासून मुंबईला दूध बंद करू,राजू शेट्टींचा इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.