जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, तमिळनाडूतील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, तमिळनाडूतील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, तमिळनाडूतील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

पुण्यात दरोडा टाकण्याच्या उद्देशानं आलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 31 डिसेंबर : कोरेगाव भीमा (koregaon Bima) येथे 1 जानेवारी विजयस्तंभ दिनाच्या (Vijaystambh din) बंदोबस्त अनुषंगाने पेट्रोलिंग करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. तमिळनाडूहून  पुण्यात दरोडा टाकण्याच्या उद्देशानं आलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे. लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत एक ओम्नी गाडीत ( TN 55 V2682)संशयित चोर येत असल्याचे माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सापळा रचून अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दरोडेखोरांची गाडी देखील जप्त केली आहे. हेही वाचा… नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी! कामाचे तास आठच राहण्याची शक्यता- अहवाल तामिळनाडूच्या दरोडेखोरांना अटक करून दुभाषीकच्या मदतीनं पोलीस पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या ताब्यातून विविध कंपनीचे 6 मोबाईल तसेच 2 लहान मोठे लोखंडी कोयते तसेच लोखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर , लोखंडी पान्हे, तसेच एकूण 11 तोळे 700 ग्रॅम सोन्याचे दागिने 100 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओम्नी जप्त करण्यात आली आहे. सदरची टोळी ही पुणे नगर हायवेवर सिगारेटच्या गाडीवर दरोडा टाकून लुटण्याचा तयारीत होती. सदरच्या टोळीकडून एकूण 8 लाख 38 हजार 638 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेशन पेयांडी तेवर (वय- 48, रा. साऊथ स्ट्रीट, कोसवा पट्टी, कोडी कुलम जि.मधुराई), शिवकुमार करपैया तेवर (वय- 39, रा. किलपट्टी नादुमाले कुलम, ता.उसलामपट्टी, जि. मधुराई,) पंडियेन सेहदू वैकट (वय-32, रा. रामनाड, ता. रामानदापुरम, जि. रामेश्वरम), सरवान गणेशन लचामी (वय-30, रा. सिक्कान्ड जि. मधुराई,) गणेशन ओच्च तेवर (वय-45, रा.कोडीकुलम ता. उसलमलामपट्टी, जि. मधुराई, सेलवराज अंथन उनिखंडी (वय-33, रा. येदनकुलम, ता. मधूकुलसर, जि. रामनदापुरम) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नाव आहेत. हेही वाचा… मुलगा झाला नाही, आईने दीड महिन्याला मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवले पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात