Home /News /crime /

मुलगा झाला नाही, आईने दीड महिन्याला मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवले

मुलगा झाला नाही, आईने दीड महिन्याला मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवले

या दाम्पत्याला मुलाची अपेक्षा होती. त्यामुळे मुलाच्या हव्यासापोटी आईने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली.

वसई, 31 डिसेंबर :  मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच स्वतःच्या 2 महिन्याच्या मुलीला (baby girl killed) पाण्याच्या टाकीत बुडवून संपविल्याचा धक्कादायक प्रकार वसई (Vasai) गावातील पाचूबंदर परिसरात घडला आहे. याप्रकरणी वसई पोलीस (Vasai Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी क्रूरकर्मा मुलीच्या आईला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वसई पाचूबंदर येथे इतुर कुटुंब राहत असून त्यांचा मासे सुकविण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास या कुटुंबातील मेरी इतुर यांचे पती व त्यांची मोठी सून मासे सुकवत असताना घरातून जुळ्या मुलींपैकी एक मुलगी बेपत्ता झाल्याने  कुटुंबीयांच्या  मदतीने सर्वत्र शोधाशोध सुरू केला असता सदर मुलगी घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये आढळून आली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच तिला मृत घोषित केले. धक्कादायक! नर्सने PPE सूट फाडून टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत केला सेक्स या प्रकरणी वसई पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चौकशी दरम्यान घाबरलेल्या मुलीच्या आईने  स्वतःच्या मुलीला टाकीमध्ये बुडविण्याची कबुली दिली. मुलाच्या जाचाला कंटाळून बळीराजानं पत्नी आणि श्वानाच्या नावावर केली संपत्ती पहिले दोन अपत्य हे मुली होत्या. त्यानंतर  चौथे आणि पाचवे अपत्ये देखील मुलीचं झाले. या दाम्पत्याला मुलाची अपेक्षा होती. त्यामुळे मुलाच्या हव्यासापोटी आईने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वसई पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या