जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पत्नी, सासू आणि मामाकडून सततचा छळ, मारहाण; कंटाळून तरुणाने घेतला मोठा निर्णय

पत्नी, सासू आणि मामाकडून सततचा छळ, मारहाण; कंटाळून तरुणाने घेतला मोठा निर्णय

पत्नी, सासू आणि मामाकडून सततचा छळ, मारहाण; कंटाळून तरुणाने घेतला मोठा निर्णय

ठाण्याच्या भिवंडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाने पत्नी, तिची आई आणि मामा यांच्या मानसिक जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या (Youth Suicide in Bhiwandi) केली आहे. ही घटना साबरा अपार्टमेंट (Sabra Apartment) भागात घडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 18 मे : ठाण्याच्या भिवंडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुणाने पत्नी, सासू आणि मामा यांच्या मानसिक जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या (Youth Suicide in Bhiwandi) केली आहे. ही घटना साबरा अपार्टमेंट (Sabra Apartment) भागात घडली. मोहंमद दानिश मोहंमद आयुब शेख (वय 22), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, मृत दानिश याच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada Police Station) तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय घडलं? मोहंमद दानिश मोहंमद आयुब शेख हा 22 वर्षीय तरुण माधवनगर भागात आपली पत्नी आणि कुटुंबीयांसोबत राहत होता. नफिसाबानो असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. नफिसाबानो ही तिची आई फातिमा मेबहूब अन्सारी हिच्या सांगण्यावरुन आपल्या पतीसोबत भांडण करायची. घर लहान असण्याचे कारण देत ती पतीसोबत वाद घालत होती. यामुळे जानेवारी 2022मध्ये दानिश आपली पत्नी नफिसाबानो आणि सासू फातिमा अन्सारीसोबत दुसऱ्या भागात राहायला आला. कारिवली रोड या भागातील साबरा अपार्टमेंट इथे तो राहू लागला. मात्र, यानंतरही दोघांमध्ये भांडण सुरुच होते. हेही वाचा -  Sheena Bora हत्याकांड प्रकरण: Indrani Mukherjea ला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर पत्नी, सासूकडून सततच्या छळ  इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत आणखी धक्कादायक प्रकार घडला. त्याच्या पत्नीचा मामा निसार याने दानिशला तर त्याच्या पत्नी आणि सासूने त्याच्या आईला मारहाण केली. या प्रकारच्या सततच्या छळाला कंटाळून अखेर त्याने टोकाचा निर्णय घेतला. त्याने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी तक्रार दिली. या तक्रारीवरुन भोईवाडा पोलिसांनी पत्नी नफिसाबानो, तिची आई फानिमा अन्सारी आणि तिचा मामा निसार शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात