मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /एअर इंडियाचे जनक जेआरडी टाटा विमानातल्या स्वच्छतेबाबत होते खूप काटेकोर; वाचा त्यांची रंजक गोष्ट

एअर इंडियाचे जनक जेआरडी टाटा विमानातल्या स्वच्छतेबाबत होते खूप काटेकोर; वाचा त्यांची रंजक गोष्ट

आज 29 जुलै रोजी आपण त्यांची 117 वी जयंती साजरी करत आहोत.

आज 29 जुलै रोजी आपण त्यांची 117 वी जयंती साजरी करत आहोत.

आज 29 जुलै रोजी आपण त्यांची 117 वी जयंती साजरी करत आहोत.

  नवी दिल्ली, 29 जुलै: तुम्ही एअर इंडियाचं (Air India) नाव ऐकलं असेलच पण या एअरलायन्सला हे नाव देणाऱ्या व्यक्तीच नाव तुम्हाला ठाऊक आहे का? एअर इंडिया हे नाव देणारी, त्या कंपनीला जगभरात भारताची आघाडीची विमान कंपनी म्हणून ओळख निर्माण करून देणारी व्यक्ती म्हणजे जेआरडी टाटा (JRD TATA). त्यांना विमानातून उड्डाण करण्याची फार आवड होती. प्रख्यात बिझनेस टायकून (Business Tycoon) आणि एव्हिएटर (Aviator) असलेले जेआरडी टाटा 1929 मध्ये देशातील पहिले परवानाधारक (Licensed) पायलट बनले. भारतीय हवाई वाहतुकीचे जनक (Father of Indian aviation) असलेल्या जेआरडी टाटा यांचं नाव जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (JRD Tata Birthday) होतं. आज 29 जुलै रोजी आपण त्यांची 117 वी जयंती साजरी करत आहोत.

  अथक परिश्रमांनी त्यांनी टाटा समूहाला यशाच्या शिखरावर नेलं

  जे. आर. डी. टाटा यांनी टाटा ॲन्ड सन्सचे (Tata Sons) अध्यक्ष म्हणून 50 वर्षे काम पाहिले. या काळात ते टाटा समूहाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेले. त्यांच्याकडे एक यशस्वी उद्योजक आणि दूरदर्शी विचारसरणीचे महान व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. टाटा यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सुद्धा मोठे योगदान दिले. आजही टाटा यांचा जीवनप्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायक आहे.

  वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा केला विमान प्रवास

  जेआरडी टाटांना विमान प्रचंड आवडत असे. वयाच्या 15 व्या वर्षी जेव्हा प्रथमच ते विमानात बसले तेव्हाच त्यांनी पायलट होण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी कमर्शियल पायलटचं लायसन्स (Commercial Pilot License) मिळवणारे ते भारतातील पहिली व्यक्ती होते. 1930 मध्ये त्यांनी आगा खान स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतातून इंग्लंडपर्यंत एकट्याने विमान प्रवास केला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांनी टाटा एअरलाइन्सची (Tata Airlines) स्थापना केली. कालांतराने टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून एअर इंडिया असं करण्यात आलं. आपल्या कार्यकाळात त्यांनी एअर इंडियाला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं. चांगली सर्व्हिस देणारी एअरलाइन्स म्हणून एअर इंडियाची ओळख निर्माण झाली.

  हे वाचा - काय सांगता! जन्मदर वाढीसाठी चीनमधील हे शहर नागरिकांना देणार प्रतिमहिना रोख रक्कम

  विमानातल्या स्वच्छतेबाबत होते खूप काटेकोर

  एअर इंडियाशी त्यांचे अतूट नाते होते. प्रवासादरम्यान स्वत: टॉयलेट पेपर (Toilet Paper) तपासत असत. एकदा तर उड्डाणाच्या वेळी स्वतःच टॉयलेटमध्ये टॉयलेट पेपर बदलण्यासाठी गेले होते. आरबीआयचे माजी गव्हर्नर लालकृष्ण झा त्यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करत होते. लिंक्डइनचे (LinkedIn) ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट यांनी जेआरडी टाटाच्या जीवनाशी संबंधित एक कथा शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जेआरडी टाटा एकदा एअर इंडियाने प्रवास करत होते. तेव्हा त्यांच्या शेजारीच आरबीआयचे माजी गव्हर्नर लालकृष्ण झा बसले होते. काही वेळाने जेआरडी टाटा बराच वेळ जागेवरून उठून कुठेतरी गेले होते. परत आल्यावर लालकृष्ण झा यांनी विचारले की एवढा वेळ कुठे गेला होतात? यावर जे.आर.डी. टाटा यांनी दिलेले उत्तर आश्चर्यकारक होतं. त्यांनी सांगितलं की टॉयलेट स्वच्छ आहे की नाही हे पाहायला गेलो होतो. टॉयलेट पेपर व्यवस्थित लावला नव्हता, तो व्यवस्थित लावत होतो.

  म्हणजे आपल्या एअर इंडिया या मालकीच्या कंपनीच्या सेवेबाबत ते किती काटेकोर होते हे या गोष्टीतून दिसून येतं. अगदी एखाद्या फ्लाइटमधील टॉयलेट पेपर नीट लावलाय का नाही याकडेही त्यांचं बारीक लक्ष असायचं. म्हणूनच जेआरडी टाटा महान होते.

  First published:
  top videos

   Tags: Tata group