• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • काय सांगता! जन्मदर वाढीसाठी चीनमधील 'हे' शहर नागरिकांना देणार प्रतिमहिना रोख रक्कम; आकडा बघून व्हाल थक्क

काय सांगता! जन्मदर वाढीसाठी चीनमधील 'हे' शहर नागरिकांना देणार प्रतिमहिना रोख रक्कम; आकडा बघून व्हाल थक्क

सरकारने जन्मदर वाढावा यासाठी स्थानिक कुटुंबांना प्रतिमहिना रक्कम देण्याची घोषणा केली.

 • Share this:
  बीजिंग, (चीन): सध्या चीन (China) घटत्या जन्मदराच्या (Declining Birthrate) समस्येनं त्रस्त आहे. काही वर्षांपूर्वी लोकसंख्या वाढल्याने चीनने अनेक कडक नियम लागू केले होते. त्यामुळे लोकसंख्या (Population) आटोक्यात आली पण जन्मदरात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले. आता जन्मदरात सुधारणा व्हावी, तो वाढावा यासाठी चीन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, देशात अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. याचा एक भाग म्हणून चीनमधील पंजिहुआ शहरानं (Panzhihua City) अनोखी घोषणा केली आहे. बाळाला जन्म देण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या शहरातील नागरिकांना रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारा चीन आता या उपाययोजना पाहता जन्मदर वाढावा यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. चीनमधील सिचुआनच्या नैऋत्य प्रांतातील पंजिहुआ शहराच्या सरकारने जन्मदर वाढावा यासाठी स्थानिक कुटुंबांना प्रतिमहिना प्रत्येक बाळासाठी 500 युआन म्हणजेच 77 डॉलरएवढी रक्कम देण्याची घोषणा बुधवारी केली. आणखी सुविधा मिळणार एका वृत्तानुसार, स्टिल उद्योगासाठी (Steel Industry) प्रसिध्द असलेले आणि सुमारे 1.2 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या पंजिहुआ शहरातील स्थानिक नोंदणीकृत मातांना मोफत प्रसूती सेवा पुरवण्यात येणार असून, मातांच्या कामाच्या ठिकाणी किंवा जवळच्या भागात नर्सरी शाळा (Nursery School) स्थापन करण्यात येणार आहे. हे वाचा - EXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं? जाणून घ्या कारण मे महिन्यात विवाह झालेल्या सर्व जोडप्यांना तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली असून, या महिन्याच्या सुरुवातीपासून ते 2025 पर्यंत मुलाचा जन्म, पालकत्व आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे वचन चीन सरकारने नागरिकांना दिले आहे. तसेच या शहरात वास्तव्य करण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्व पात्र शिक्षक, वैद्यकीय व्यावसायिक आणि उद्योजकांना बोनस (Bonus) स्वरुपात रोख रक्कम देण्यात येणार असल्याचे वृत्तात म्हटलं आहे. चीनमध्ये घटतोय प्रजनन दर कोविड-19 महामारीच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर सर्वत्र अनिश्चितता असून, सुमारे 6 दशकांच्या तुलनेत गेल्या वर्षी चीनमधील जन्म दर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. चीनमधील लोकसंख्या सध्या 1.41 अब्ज असून, 2025 पूर्वीच लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असे ब्लुमबर्ग इकॉनॉमिक्स चे अनुमान सांगते. लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी चीनने कडक नियम लागू केले होते. त्यानंतर येथील प्रजनन दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. यात आता सुधारणा करण्याचे चीनचे धोरण असून, जन्मदर वाढावा यासाठी स्थानिक नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे.
  First published: