मुंबई, 2 डिसेंबर : भारतात iPhone चे अनेक फॅन्स आहेत. कधी कामासाठी, तर कधी हौस म्हणून iPhone घेणाऱ्यांची संख्या भारतात वाढतच आहे. तसंही मोबाइल कंपन्यांसाठी भारत हे मोठं आणि महत्त्वाचं मार्केट मानलं जातं. त्यात आता नवनवीन फीचर्ससह येणारे iPhone तर खास आकर्षण असतात; पण अनेकांना iPhone घ्यायची इच्छा असूनही त्यांच्या जास्त असलेल्या किमतींमुळे घेता येत नाहीत. अशा iPhone फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple कंपनी 2022 च्या मार्च महिन्यात नवीन फीचर्स असलेला आणि मुख्य म्हणजे स्वस्त iPhone लाँच करणार असल्याची माहिती आहे. ‘झी न्यूज’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
तैवानमधल्या ट्रेंडफोर्स या फर्मनं दिलेल्या माहितीनुसार Apple कंपनी 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत थर्ड जनरेशन iPhone SE लाँच करण्याची शक्यता आहे. या ठरलेल्या वेळेत हा फोन लाँच झाला तर हे डिव्हाइस मार्च अखेरीपर्यंत उपलब्ध होईल अशी आशा आहे. iPhone SE मध्ये 5G साठी काही अतिरिक्त फिचर्सही असतील. तसेच हा मिडरेंज स्मार्टफोन असेल असं TrendForce नं म्हटलं आहे. याचाच अर्थ हा सर्वांत स्वस्त 5G iPhone असू शकतो.
हेही वाचा : Facebook तुम्हाला ट्रॅक करतंय का? असं होत असेल तर कसं सुरक्षित ठेवाल अकाऊंट
iPhone SE चं डिझाईन सध्याच्या मॉडेलसारखंच असेल असा दावा Apple चे तज्ज्ञ मिंग-ची कू यांनी केला आहे. हे डिझाइन iPhone 8 आधारित आहे. यामध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले, चॅट आयडी होम बटण आणि मोठे बेसल आहेत. या डिव्हाइसमध्ये अपडेट करण्यात आलेल्या गोष्टी म्हणजे 5G साठी सपोर्ट आणि वेगवान प्रोसेसर म्हणजेच A15 चिप असेल, असं कू यांनी म्हटलं आहे.
Apple त्याच्या थर्ड जनरेशनच्या iPhone SE अंतर्गत आणखी चार मॉडेल्स लाँच करण्यावर ठाम आहे. 2022 मध्ये याचं उत्पादन 25-30 मिलियन युनिटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा : WhatsApp Payment: तुमचा UPI PIN विसरलात? काही मिनिटांत असा बदला
Apple त्यांच्या iPhone SE च्या मोठ्या व्हर्जनवर काम करत आहे, अशा अफवाही ऐकायला येत आहेत; मात्र ते डिव्हाइस 2023 च्या आधी येण्याची शक्यता नाही. सर्वांत आधी मूळ iPhone SE 2016 च्या मार्चमध्ये बाजारात आणण्यात आला होता आणि सप्टेंबर 2018 मध्ये बंद करण्यात आला होता. सेकंड जनरेशन iPhone SE एप्रिल 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्याची विक्री अजूनही सुरू आहे. 64GB स्टोरेजसाठी त्याची किंमत आहे 399 डॉलर्स म्हणजेच 29,928 रुपये, तर 128 GB स्टोरेज व्हॅरिएंटसाठी 449 डॉलर्स म्हणजेच 33,679 रुपये मोजावे लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.