मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बँकेत FD करण्याआधी तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

बँकेत FD करण्याआधी तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

तुम्ही एका क्लीकवर पैसे FD मध्ये ठेवू शकता. त्याआधी तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही एका क्लीकवर पैसे FD मध्ये ठेवू शकता. त्याआधी तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही एका क्लीकवर पैसे FD मध्ये ठेवू शकता. त्याआधी तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : बँकेत किंवा पोस्टात FD करणं म्हणजे एक सुरक्षित गुंतवणूक असं आजही म्हटलं जातं. बँकेत FD मध्ये ठेवलेले पैसे कुठेही जात नाहीत. गरजेच्या वेळी ते उपयोगी पडतात त्यामुळे अनेक नागरिक आजही बँक किंवा पोस्टात आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून FD पर्याय निवडतात. पण तुम्हाला FD बद्दलच्या काही इंटेस्टिंग गोष्टी माहिती आहेत का?

तुम्ही अजूनही तुमचे पैसे FD मध्ये गुंतवले नसतील किंवा गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात. आजकाल FD हे ऑनलाइन देखील करता येतं. तुम्ही एका क्लीकवर पैसे FD मध्ये ठेवू शकता. त्याआधी तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

FD मध्ये कोण पैसे ठेवू शकतं?

18 वर्षांवरील ज्या व्यक्तीचं बँक खात्यामध्ये अकाउंट आहे तो ग्राहक FD साठी पैसे ठेवू शकतो. याशिवाय खासगी आणि पब्लिक कंपन्या, पार्टनरशिप फर्म, सोसायटी देखील FD खात्यात पैसे ठेवू शकतात.

आणखी वाचा- ...नाहीतर बँक खातं होईल बंद

FD चा कालावधी किती असतो?

एफडीचा कालावधी 7 दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत तुम्ही ठेवू शकता. काही बँका २० वर्ष ठेवण्याची मुदत देतात. कमीत कमी ९ ते १२ महिन्यांसाठी देखील काही बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा नियम असतो.

टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक इन कालावधी किती असतो?

टेक्स सेव्हिंग एफडीचा कालावधी 5 वर्षांचा असतो. या दरम्यान तुम्ही पैसे काढू शकत नाही

कमीत कमी किती रुपयांची FD करता येते?

बँका आणि एनबीएफसीद्वारे एफडी उघडण्यासाठी किमान ठेव रक्कम 1000 रुपये निश्चित केली गेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये किमान ठेवींचे निकष कमी असू शकतात, तर खासगी क्षेत्रातील काही मोठ्या बँकांनी किमान पाच हजार रुपये ठेव निश्चित केली आहे. टॅक्स सेव्हिंग एफडी तुम्ही 100 रुपयांपासून सुरू करू शकता.

आणखी वाचा- फिक्स डिपॉझिटचे प्रकार किती?

FD च्या व्याजावर कर लागतो का, तो किती असतो?

हो, जर व्याज 40 हजार किंवा त्याहून अधिक असेल तर टॅक्स भरावा लागतो. 10 टक्के TDS भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यांना 50 हजार रुपयांहून अधिक व्याज असेल त्यांनाच कर लागेल.

FD साठी पॅनकार्ड आवश्यक आहे का?

तुमच्याजवळ पॅनकार्ड नसेल तर तुम्ही 60/11 फॉर्म भरून FD खातं उघडू शकता. बँकेत FD खातं उघडण्यासाठी पॅन आवश्यक आहे. ऑनलाइन FD साठी देखील पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे.

आणखी वाचा- सावधान तुम्ही ही चूक तर करत नाही?

FD मोडली तर किती पेनल्टी घेतली जाते?

FD वेळेआधी मोडली तर 1 टक्के पेनल्टी घेतली जाते. तुम्हाला FD वर लोन घेता येतं मात्र अशावेळी FD मोडता येत नाही.

अल्पवयीन मुलाच्या नावे FD वर पैसे ठेवता येतात का?

काही बँका पालकांना त्यांच्या मुलांच्या नावाने FD सुरू करण्याची मुभा देतात. त्यावर नॉमिनी म्हणून पालकांचं नाव येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांच्या नावाने पोस्टात किंवा बँकेत FD मध्ये काही शाखांमध्ये पैसे ठेवता येतात. मात्र हे प्रत्येक बँकेच्या नियमावर अवलंबून आहे.

First published:

Tags: Bank exam, Icici bank, SBI bank