जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Malaika Arora: तुम्हालाही हवेत मलायकासारखे सुडौल आणि सुंदर पाय; मग नक्की करा हे व्यायामप्रकार

Malaika Arora: तुम्हालाही हवेत मलायकासारखे सुडौल आणि सुंदर पाय; मग नक्की करा हे व्यायामप्रकार

Malaika Arora: तुम्हालाही हवेत मलायकासारखे सुडौल आणि सुंदर पाय; मग नक्की करा हे व्यायामप्रकार

बॉलिवूड दिवा मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. तिची टोन्ड बॉडी आणि सेक्सी कर्व्ह अनेकांसाठी हेव्याचा विषय आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 11 ऑगस्ट-   बॉलिवूड दिवा मलायका अरोरा  तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. तिची टोन्ड बॉडी आणि सेक्सी कर्व्ह अनेकांसाठी हेव्याचा विषय आहे. योग्य तो व्यायाम आणि बॅलन्स्ड डाएटमुळे 48 वर्षांच्या मलायकाच्या चेहऱ्यावर तिचं वय अजिबात दिसून येत नाही. पण सगळ्यांत लक्ष वेधून घेतात ते तिचे लांबसडक पाय. असे लांबसडक पाय असतील तर कुठल्या महिलेला शॉर्ट ड्रेस घालायला आवडणार नाही? असे लांबसडक पाय, मांड्या आणि कमरेखालचा भाग टोन्ड व्हावा यासाठी मलायका व्यायामाचे अनेक व्हिडिओजही शेअर करत असते. आपल्या परफेक्ट बॉडी शेपमुळे मलायका फिटनेस आणि व्यायामासाठी अनेकांची प्रेरणा आहे. नुकताच तिनं मांड्या टोन्ड करण्यासाठीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रेरणा घेऊन आले आहे. तुम्ही नियमित आणि सतत व्यायाम करत आहात अशी मी आशा करते मला हाय इंटेन्सिटी असलेले वर्कआउट (High Intensity Workout) करायला आवडतं. यामुळे माझं शरीर टोन्ड होतं. आणि तुम्हाला माहिती आहे कधीकधी अगदी साधीसोपी वाटणारी आसनं सगळ्यांत जास्त परिणामकारक असतात. माझ्या सगळ्यांत आवडत्या आसनांपैकी एक आहे उत्कटासन म्हणजेच चेअर पोझ (Chair Pose). या आसनामुळे कंबरेखालच्या भागाचे स्नायू तर बळकट होतातच पण शरीराच्या वरच्या भागालाही मदत होते. आणि तणाव कमी करण्यातही हे आसन उपयुक्त आहे,’ असं मलायकानं आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हे आसन /एक्सरसाईज कसं आहे ते बघूया. · यासाठी सगळ्यांत आधी एकदम सरळ उभे राहा. · दीर्घ श्वास घेऊन सुरुवात करा. · हळूहळू तुमचे हिप्स मागे घ्या आणि गुडघे वाकवायला सुरुवात करा. · आता श्वास घेत तुमचे हात वर उचला आणि श्वास दीर्घ आणि नेहमीप्रमाणे ठेवा. · आता तुमच्या शरीराचं सगळं वजन तुमच्या मांड्यांवर येईल. गुडघ्यांवर हे वजन अजिबात येऊ देऊ नका. · अशी अवस्था असताना तुम्हाला तुमची पाठ आणि मांड्यांवर थोडा ताण जाणवेल. · कमीतकमी 5 दीर्घ श्वास होईपर्यंत याच मुद्रेत राहा. · आता हळूहळू श्वास घेत सामान्य स्थितीत या आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी परत सरळ उभे राहा.

    News18

    तुमचे पाय मजबूत तरीही सुडौल ठेवायचे असतील तर त्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे पाय टोन्ड आणि सुंदर तर दिसतीलच. पण दिवसभर आपल्याला पायांवरच तर चालायचं असतं. त्यासाठीही पायांचा व्यायाम महत्त्वाचा आहे. तुमच्या शरीराच्या खालच्या भागाचे स्नायू बळकट झाले तर तुमचे सांधेही मजबूत होतील आणि स्नायू लवचिक होण्यासही मदत होईल. यामुळे तुमची दैनंदिन कामं करणं तुम्हाला सोपं जाईल. तसंच एखाद्यावेळेस दुखापत झाली तर त्यापासूनचा धोकाही कमी होईल. शिवाय यामुळे तुमचा स्पीडही वाढेल आणि तुमचं पोश्चरही यामुळे योग्य होईल. (हे वाचा: Running Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर ) पायांच्या व्यायामासाठीचे फायदे तुमच्या वर्कआउटमध्ये लेग डेचाही (Leg Day) समावेश करा. महिलांसाठी तर हे अगदी अत्यावश्यक आहे. माहिलांचे हिप्स पुरुषांच्या तुलनेत थोडे रुंद असतात आणि स्त्रियांच्या गुडघे आणि हिप्सच्या सांध्यांमधली गॅपही रुंद असते. त्यामुळे महिलांच्या गुडघ्यांवर खूप जास्त ताण पडतो. त्यामुळे त्यांच्या गुडघ्यांना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. पायांच्या एक्सरसाईजमुळे हाडं मजबूत होतात. त्यामुळे तुमच्या शरीराला आधारही जास्त मिळेल आणि दुखापतीचा धोकाही कमी होतो. तुमचे पाय सुडौल व्हावेत असं वाटत असेल तर मलायकासारखा एक्सरसाईज तुम्ही अवश्य करून बघा. किंबहुना रोज व्यायाम ही तुमची सवय बनवा. त्यामुळे तुमच्या फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात