मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Running Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर

Running Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर

धावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आता प्रश्न पडतो की किती किलोमीटर धावणे जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी.

धावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आता प्रश्न पडतो की किती किलोमीटर धावणे जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी.

धावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आता प्रश्न पडतो की किती किलोमीटर धावणे जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी.

  मुंबई, 9 ऑगस्ट : वजन कमी करण्यासाठी लोक नवनवीन मार्ग अवलंबतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासन्तास घाम गाळतात. तर मोठ्या संख्येने लोक उद्यानांमध्ये व्यायाम करतात. धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे, जो आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतो. तुम्ही सकाळी रस्त्यावर बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला अनेक लोक धावताना दिसतील. वजन कमी करण्यासाठी धावणे हा एक उत्तम मार्ग आहे. दररोज काही किलोमीटर धावून तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता आणि सहज वजन कमी करू शकता. बरेच लोक दररोज किती किलोमीटर धावल्याने वजन कमी होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. याबद्दल सविस्तर जाणून घ्या. धावल्यामुळे होतात कॅलरी बर्न हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, धावण्याने मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. व्यायामापेक्षा धावणे वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. धावताना, आपल्या शरीराच्या बहुतेक स्नायूंची जास्तीत जास्त शक्ती वापरली जाते. एका संशोधनात असे समोर आले आहे की, 1600 मीटर धावल्याने चालण्यापेक्षा 35 कॅलरीज जास्त जळतात. जर तुम्ही दररोज 8-10 किलोमीटर धावत असाल तर तुम्ही चालण्यापेक्षा 350 कॅलरीज जास्त जाळू शकता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, 10 किमी प्रतितास वेगाने 30 मिनिटे धावल्याने सुमारे 372 कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही दररोज असे केले तर तुमचे वजन खूप कमी होऊ शकते.

  Deep Breathing Benefits : दीर्घ श्वास घेण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहित नसतील, एकदा नक्क्की वाचा

  पोटाची चरबी कमी करण्यासाठीदेखील प्रभावी आत्तापर्यंतच्या अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, पोटाची चरबी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे हृदयविकार, टाइप 2 मधुमेहासह अनेक आजारांचा धोका वाढतो. धावण्यासारखा उच्च एरोबिक व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. विशेष म्हणजे जर तुम्ही धावत असाल तर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करण्याचीही गरज भासणार नाही आणि तुम्ही फिट राहाल. मात्र यासाठी तुम्हाला उच्च तीव्रता म्हणजेच वेगवान धावणे आवश्यक आहे. सायकलिंगमुळे पोटाची चरबीही कमी होऊ शकते. Food For Memory : स्मरणशक्ती वाढवतील हे पदार्थ, माईंड सुपरफास्ट होण्यासाठी असा असावा आहा धावण्याचे फायदे जाणून घ्या - दररोज 5 ते 10 मिनिटे धावल्याने हृदयविकाराचा धोका 45% कमी होतो. - धावल्याने साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे स्नायूंच्या पेशींमध्ये साखर साठते. - धावल्याने मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो. याशिवाय इतर आजारांपासून संरक्षण होते. - 60 वर्षांवरील लोकांनी गुडघेदुखी टाळण्यासाठी धावणे आवश्यक आहे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Weight loss, Workout

  पुढील बातम्या