Elec-widget

तुकाराम मुंढे कामाला लागले, लेटलतिफांचा एका दिवसाचा पगार कापला

तुकाराम मुंढे कामाला लागले, लेटलतिफांचा एका दिवसाचा पगार कापला

तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पुणे परिवहन सेवेतील लेटलतिफांना दणका दिलाय. 125 कर्मचाऱ्यांचा कामावर उशिरा आल्याबद्दल एका दिवसाचा पगार कापलाय

  • Share this:

30 मार्च : तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पुणे परिवहन सेवेतील लेटलतिफांना दणका दिलाय. परिवहन सेवेतील 125 कर्मचाऱ्यांचा कामावर उशिरा आल्याबद्दल एका दिवसाचा पगार कापलाय.

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुढे यांची बदली झाली. त्यांची नियुक्ती पुणे परिवहनच्या सीएमडीपदी झाली.  पीएमपीएमएलची सूत्र स्विकारल्या स्विकारल्या मुंढे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केलाय. यानुसार परिवहन सेवेतील १०० नादुरूस्त बसेस त्यांनी त्वरीत दुरूस्तीला पाठवल्यात. या १०० बसेस त्यांनी १५ दिवसांत दुरूस्त करून पुन्हा रस्त्यांवर आणायला सांगितलंय. तसंच उशिराने हजर राहणाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापून वेळेत येण्याचा धडा शिकवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...