मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

MP: जनरेटरमध्ये ब्लास्ट होऊन खाजगी रुग्णालयाला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

MP: जनरेटरमध्ये ब्लास्ट होऊन खाजगी रुग्णालयाला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

MP: जनरेटरमध्ये ब्लास्ट होऊन खाजगी रुग्णालयाला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

MP: जनरेटरमध्ये ब्लास्ट होऊन खाजगी रुग्णालयाला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

Fire accident in Jabalpur, MP: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील रूग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 ऑगस्ट: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका खासगी रुग्णालयात आज भीषण आग (Jabalpur fire accident) लागली. या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये  (Fire in New Life Multispecialty hospital, Jabalpur) जनरेटरमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश रुग्णालयातील कर्मचारी आहेत. आग आटोक्यात आली असली तरी रुग्णालयात खळबळ उडाली आहे. येथे दाखल झालेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना आता इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जबलपूरचे मुख्य पोलीस अधीक्षक अखिलेश गौर यांनी सांगितले की, रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ही आग तळमजल्यापासून तिसऱ्या मजल्यावर पसरली. सीएम शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या आगीत ज्यांनी जीव गमावला आहे, त्यांना आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे. प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर गंभीर जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासोबतच जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्चही राज्य सरकार उचलणार आहे. हेही वाचा- ITR Verification: मुदत संपली तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही? कारवाई टाळण्यासाठी करा 'हे' काम हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग: हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग असल्यानं बहुतांश लोक आत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बघता बघता आगीनं भीषण रूप धारण केलं. हॉस्पिटलला लागलेली आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या गाड्यांना त्यावर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. त्यानंतर वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन कापलं. यानंतर सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली. 8 जणांना गमवावा लागला जीव- या घटनेची पुष्टी करताना जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी सांगितले की, गंभीर भाजल्यामुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासह तीन जण गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यासोबतच अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम आता सुरू आहे. या घटनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे वक्तव्यही आले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, जबलपूर येथील रुग्णालयात भीषण आग दुर्घटनेची दुःखद बातमी मिळाली आहे. मी स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्या सतत संपर्कात आहे. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत. मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Fire, Hospital Fire, जळीतकांड. Fire

    पुढील बातम्या