मुंबई, 1 ऑगस्ट: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. आयकर विभागानं रविवारी सांगितलं की 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत सुमारे 68 लाख आयकर रिटर्न भरले गेले. त्याच वेळी, 30 जुलैपर्यंत 5.10 कोटींहून अधिक कर रिटर्न भरले गेले होते. परंतु सरकारकडून वारंवार स्मरण करूनही अनेकांनी आतापर्यंत आयटीआर दाखल केलेला नाही. आयकर रिटर्न अजूनही भरला नसेल तर? ज्यांनी आत्तापर्यंत रिटर्न भरले नाहीत त्यांना अजूनही संधी मिळणार आहे, मात्र त्यासाठी त्यांना दंड भरावा लागेल आणि त्याचवेळी त्यांच्यासाठी काही नियमही बदलतील. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने माहिती दिली आहे की, आयकर रिटर्नच्या (ITR) पडताळणीची अंतिम मुदत कमी करण्यात आली आहे. 29 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे सीबीडीटीने हे घोषित केलं. ही अधिसूचना 1 ऑगस्ट 2022 पासून म्हणजेच आजपासून लागू झाली आहे. आता ITR दाखल केल्यापासून 120 दिवसांत नाही तर 30 दिवसांत त्याची पडताळणी करावी लागेल. हेही वाचा- मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी करा स्मार्ट गुंतवणूक, या मार्गाने जमवा 55 लाख रूपये 31 जुलै 2022 पर्यंत ज्या करदात्यांनी ITR दाखल केला होता, त्यांच्यासाठी वेरिफिकेशनची अंतिम मुदत 120 दिवसांपर्यंत आहे, तथापि 31 जुलै 2022 नंतर दाखल केलेल्या ITR ची अंतिम मुदत 120 दिवसांवरून 30 दिवसांवर आणली आहे. अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे की, जर रिटर्न डेटा या अधिसूचनेच्या प्रभावी होण्याच्या तारखेपूर्वी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसारित केला गेला असेल, तर अशा रिटर्नच्या संदर्भात 120 दिवसांची पूर्वीची मुदत लागू होईल. 30 दिवसांनी ITR-V सबमिट केल्यास काय होईल? जर कालावधीनंतर फॉर्म ITR-V सबमिट केला असेल, तर असं गृहित धरलं जाईल की, ज्या रिटर्नसाठी फॉर्म ITR-V भरला होता, तो कधीही सबमिट केला गेला नाही, म्हणजेच कर विभाग तो प्रक्रियेसाठी घेणार नाही आणि करदात्याच्या डेटाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पुन्हा प्रसारित करावं लागेल. त्यानंतर नवीन फॉर्म ITR-V देखील 30 दिवसांच्या आत सबमिट करावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.