मुंबई, 26 ऑगस्ट : मुंबईत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळीमध्ये पूनम चेंबरजवळ स्टर्लिंग सीफॅस इमारतीला ही आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास इमारतीच्या 10व्या मजल्यावर ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी तातडीने 11 व्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. या अपघातात कोणीही जखमी झालं नसून अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली आहे. मुंबई जवळील शहरात भर दुपारी तुफान राडा; तलवारीने केलेल्या हल्ल्यात 1 ठार, 3 जखमी सध्या कूलिंग करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तर भीती शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं प्राथमिक कारण समोर आलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईत इमारतींना आग लागण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. देशातील विविध मुद्द्यांवर सोनिया गांधी घेणार बैठक; मुख्यमंत्रीही होणार सहभागी अशात राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शॉक सर्किट आणि इमारत कोसळण्याच्या दुर्घटना वारंवार समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांआधी मुंबईच्या मस्जिद बंदर स्टेशन बाहेर एका 7 इमारतीला आग भीषण आग लागली होती. रहिवासी इमारतीला ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.