विरार, 25 ऑगस्ट : विरारमध्ये भर दिवसा रस्त्यामध्ये शिकलकरी समाजाच्या दोन गटात हाणामारी झाली. यात तलवारीचा वापर करून हल्ला करण्यात आला. या हाणामारीत चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदरच्या दोनही गटात मागील काही वर्षांपासून आपआपसांत वाद सुरू आहेत. त्यावरून आज दुपारी विरार चंदनसार परिसरात साईनाथ झोपडपट्टी येथे राहणाऱ्या टाक कुटुंबांवर काही अज्ञात इसमांनी तलवारीने हल्ला केला. यात पिल्लासिंग टाक याला उपचारासाठी नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-धक्कादायक! जुन्या वादात थेट चौघांना केलं खल्लास, चाकून भोसकून जागेवरच संपवलं
हल्ल्यात टक्कूसिंग,चिमनसिंग,राहुल हे जखमी झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.
दरम्यान, दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे पोलीस लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन ही दहशत मोडून काढणार का, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.