• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 5 lakh km प्रवास करून हातपाय खिळखिळे होईपर्यंत अख्खा देश पिंजून काढला; अखेर 24 वर्षांनंतर बापाने हरवलेल्या लेकाला शोधलंच!

5 lakh km प्रवास करून हातपाय खिळखिळे होईपर्यंत अख्खा देश पिंजून काढला; अखेर 24 वर्षांनंतर बापाने हरवलेल्या लेकाला शोधलंच!

2 वर्षांच्या मुलाचं अपहरण झाल्यानंतर बापाने त्याला शोधून काढण्यासाठी धडपड केली.

  • Share this:
बीजिंग, 14 जुलै:  प्रत्येक आई-बाबासाठी सर्वात अनमोल काय असतं तर ते त्यांचं मूल. मुलं म्हणजेच पालकांचं आयुष्य, जीव असतात. त्यांना गमावणं हेच पालकांचं सर्वात मोठं दुःख असतं आणि त्यांच्यासाठी ते काहीही करू शकतात. सध्या असाच आपल्या लेकासाठी धडपडणाऱ्या बापाचा (Father son video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याने आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध (Father meet son after 24 years of kidnapping) घेण्यासाठी संपूर्ण देश पिंजून काढला. हातपायही खिळखिळे होईपर्यंत तब्बल 5 लाख किमी प्रवास केला. अखेर 24 वर्षांनंतर त्याने आपल्या लेकाला शोधून काढलंच (China father son). 1997 मध्ये चीनमधील शॅनडॉन्ग शहरातून एका 2 वर्षांच्या मुलाचं अपहरण झालं होते. हा मुलगा घराच्या परिसरात खेळत असताना एका महिलेनं त्याचं अपहरण केलं. त्यानंतर या महिलेनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं या मुलाची हेनान (Henan) प्रांतात विक्री केल्याचं स्थानिक मिडीयाचं म्हणणं आहे. त्यानंतर या मुलाच्या पित्याने चीनमधील अनेक भागांत आपल्या मुलाचा शोध घेतला. ग्युओ गॅंगटॅंग असे या पित्याचे नाव असून त्याने 24 वर्ष आपल्या मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. या शोध मोहिमेदरम्यान त्यांनी मोटारसायकलवरुन 3 लाख मैल म्हणजेच सुमारे 5 लाख किलोमीटरचा प्रवास केला.  चीनमधील सुमारे 20 प्रातांमध्ये त्याने मुलाच्या शोधार्थ प्रवास केला. या शोध प्रवासात पित्याला अनेक खडतर समस्यांचा सामना करावा लागला. अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. प्रवासादरम्यान ट्रॅफिक दुर्घटनांमध्ये ते अनेकदा जखमी झाले. तसेच त्यांच्या 10 मोटार सायकलींचे नुकसान झाले. पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. या प्रवासादरम्यान ही व्यक्ती नेहमी आपल्या हातात दोन बॅनर घेऊन वाटचाल करत होती.   या दोन्ही बॅनरवर त्याचा मुलगा ग्युओ जिनजेन याचा फोटो असायचा. हे वाचा - 10 बाळांना जन्म देणारी 'ती' कधी प्रेग्नंट नव्हती,नाटकामागचं कारण ऐकून बसेल धक्का एकदा चीनमधील स्थानिक मिडीयाशी बोलताना गॅंगटॅंग यांनी सांगितले की माझ्या मुलाचा शोध सुरु ठेवत असताना माझ्यातील पित्याची मला जाणीव होते. जवळपास अडीच दशकांनंतर या पित्याची (Father) आपल्या मुलाशी भेट झाली. जिनजेन हेनान प्रांतात रहात असताना तुझे वडील तुला शोधत असल्याचे पोलिसांनी त्याला सांगितले. त्यानंतर या दोघांची भेट एका पोलिस स्टेशनसमोर घडवून आणण्यात आली. ही भावनिक भेट चीनमधील प्रमुख वृत्तसंस्थांनी (Mainstream Media) प्राधान्याने दाखवली. 26 वर्षीय जिनजेन हा एक शिक्षक म्हणून काम करतो. पोलिस दलाने जिनजेनची ओळख पटवण्यासाठी त्याची डीएनए टेस्टही (DNA Testing) केली होती. 24 वर्षांनंतर पित्याला आपला मुलगा सापडला आणि दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघांनी गळाभेट घेत आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला असून, नेटिझन्सकडून त्याला पसंती मिळत आहे. या पित्याने आपल्या मुलाच्या शोधार्थ केलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे वाचा - मुलीवर शार्कनं हल्ला करताच वडील बनले ढाल; समुद्रात उडी घेतली अन्... विशेष म्हणजे या पित्याचा पुत्र शोधाचा प्रवास मोठ्या पडद्यावरही चित्रपटाच्या रुपाने प्रदर्शित झाला होता. 2015 मध्ये या घटनेवर आधारित लॉस्ट अँड लव्ह हा चित्रपट (Movie) प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हॉंगकॉंगमधील लोकप्रिय सेलिब्रिटी अँडी लॉने काम केलं होतं. मुलाचा शोध लागल्याचं समजातच लॉ ने दोघांचेही अभिनंदन केलं आहे.
First published: