लाडाची लेक समलैंगिक असल्याचं समजताच वडिलांनी स्वत:ला संपवलं, डोक्यात घातल्या गोळ्या

मुलगी समलैंगिक असल्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या शाहदरामधील विश्वास नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. मुलगी समलैंगिक असल्याचं समजल्यापासून वडिल हे चिंतेत होते. पित्याच्या आत्महत्ये आधी घरात या मुद्द्यावरून मोठा वाद झाला.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 02:13 PM IST

लाडाची लेक समलैंगिक असल्याचं समजताच वडिलांनी स्वत:ला संपवलं, डोक्यात घातल्या गोळ्या

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये धक्कादायक गुन्ह्यांच्या आणि मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. एका वडिलांनी आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे. गावठी कट्ट्याने स्वत:च्या डोक्यात गोळ्या घालून वडिलांनी जीवन संपवलं आहे. या प्रकरामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी समलैंगिक असल्यामुळे या पित्याने आयुष्य संपवलं असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी समलैंगिक असल्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या शाहदरामधील विश्वास नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. मुलगी समलैंगिक असल्याचं समजल्यापासून वडिल हे चिंतेत होते. पित्याच्या आत्महत्ये आधी घरात या मुद्द्यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी रात्री रागाच्या भरात स्वत:ला गोळी मारून घेतली. गोळीचा आवाज होताच कुटुंबीय गोळा झाले. त्यानंतर त्यांनी तात्काळ वडिलांना रुग्णालयात नेलं. पण. तोपर्यंत त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकणात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. तर मुलगी समलैंगिक आहे का याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर शेजारील लोकांचीही चौकशी होणार आहे.

चांद्रयान - 2: लँडरला जिवंत करण्यासाठी NASAचे जबरदस्त प्रयत्न, असा पाठवला मेसेज!

मुंबईत नरबळी.. त्याने मित्राच्याच जुळ्या मुलांची हत्या करण्याचा असा घेतला निर्णय

Loading...

मुंबईतला उच्चभ्र समजल्या जाणाऱ्या कुलाबा परिसरात तीन वर्षांच्या चिमुरडीचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (7 सप्टेंबर) कुलाब्यातील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून शनाया हाथीरामाणी या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. परंतु हा अपघात नसून घातपात होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. नरबळीच्या उद्देशाने शनायाची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी मारेकरी अनिल जुगाणी याला पोलिसांनी अटक केली आहे.

इतर बातम्या - अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण!

काय आहे प्रकरण?

आरोपी अनिल जुगाणी हा काही वर्षे मोरक्कोत वास्तव्य करत होता. तो सहा महिन्यापूर्वीच मुंबईत परतला. मोरक्कोत एका महिलेने त्याच्यावर जादुटोणा केला होता. यातून बाहेर यायचे असेल तर दोन जुळ्या मुलांचा नरबळी द्यावा लागेल, असा तोटका करण्यास अनिलला सांगण्यात आले होते. अनिल मुंबईत आल्यानंतर सातत्याने त्याच्या डायरीत दोन जुळ्यांची हत्या कर, जेलमध्ये जा आणि स्वतःला वाचव,असे लिहीत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली आहे.

इतर बातम्या - स्पा सेंटरमध्ये महिला आयोगाची धाड, एका खोलीत 3 ग्राहक 4 मुली आणि आढळले कंडोम!

VIDEO: वाहतूक कोंडीत शिरले दोन बैल आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहा

लाडाची लेक समलैंगिक असल्याचं समजताचं वडिलांचं मोठं पाऊल, स्वत:च्या डोक्यात घातल्या गोळ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...