स्पा सेंटरमध्ये पुन्हा महिला आयोगाची धाड, एका खोलीत 3 ग्राहक 4 मुली आणि ढिगभर आढळले कंडोम!

स्पा सेंटरमध्ये पुन्हा महिला आयोगाची धाड, एका खोलीत 3 ग्राहक 4 मुली आणि ढिगभर आढळले कंडोम!

धक्कादायक म्हणजे सेक्स रॅकेट चालवत असलेल्या या स्पाने स्वत:ची वेबसाईटही सुरू केली होती. वेबसाइटवर महिलांच्या फोटोंव्यतिरिक्त त्यांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी किंमती दिल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी गुरुवारी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटविरूद्ध पर्दाफाश केला आहे. स्वाती यांनी गुन्हे शाखेच्या सहकार्याने बुरा़ी इथल्या स्पा सेंटरवर छापा टाकला. तेव्हा धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. 18 प्लस ब्यूटी टेंपल म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्पामध्ये भूमिगत लहान खोल्या होत्या. बटण दाबून तळघर दरवाजा उघडला गेला. यामध्ये अनेक तरुण पुरुष आणि महिला आपत्तिजनक अवस्थेत सापडल्या. यादरम्यान, इथे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती तरुणांनी आणि ग्राहकांनी दिली.

छापा टाकण्य़ासाठी गुन्हे शाखेने दर्शविला पाठिंबा

बुराडीच्या या स्पा सेंटरची माहिती मिळाल्यानंतर स्वाती यांनी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधला. यानंतर, डीसीडब्ल्यू टीम आणि पोलिसांसह त्यांनी स्पा सेंटर गाठलं. इथे एक पोलिस अधिकारी आणि डीसीडब्ल्यू कर्मचारी ग्राहक बनून स्पामध्ये गेले. स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचं समजताच पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला.

स्पामधील मेन्यू कार्डवर महिलांचे फोटो आणि किंमत

धक्कादायक म्हणजे सेक्स रॅकेट चालवत असलेल्या या स्पाने स्वत:ची वेबसाईटही सुरू केली होती. वेबसाइटवर महिलांच्या फोटोंव्यतिरिक्त त्यांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी किंमती दिल्या होत्या. बरं इतकंच नाही तर स्पा सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मेन्यू कार्ड दिलं जातं आणि त्यामध्ये दिलेला पर्याय निवडल्यानंतर त्यांना त्यानुसार पैसे द्यावे लागतात. रेट कार्डवर अशी सेवाही या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इतर बातम्या - बाप्पाचा निरोप भक्तासाठी ठरला अखेरचा, तलावात बुडून झाला मृत्यू

स्पामध्ये जबरदस्त सुरक्षा, बटन दाबल्यावर उघडले गुप्त दरवाजे

स्पा सेंटरमध्ये काय चाललं आहे याची कोणालाही खबर लागू नये म्हणून इथे तळघर बांधलं गेलं होतं. या तळघरांमध्ये लहान खोल्यादेखील आहेत. बटण दाबून तळघराचा दरवाजा उघडला जातो. स्वाती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्पा एका घरातून चालवला जातो. या संदर्भात, दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर ही कारवाई केली गेली.

इतर बातम्या - उदयनराजेंचं भाजप प्रवेशावर काय ठरलं?, तातडीने घेणार शरद पवारांची भेट

3 ग्राहकांसह 4 मुली विवस्त्र आढळल्या एका खोलीत

तळघरात गेल्यावर तिथे 3 ग्राहक आढळले. या सर्वांसह 4 महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या. यावेळी खोलीतून मोठ्या प्रमाणात कंडोम आणि इतर आक्षेपार्ह साहित्यही जप्त केलं. पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकासह तीन ग्राहक आणि चार युवतींना ताब्यात घेतलं आहे.

VIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: delhi
First Published: Sep 12, 2019 11:25 AM IST

ताज्या बातम्या