नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : भारताचं चांद्रयान-2 (Chandrayaan-2) मिशन अद्याप संपलेलं नाही. ISROच्या वैज्ञानिकांनी लँडर विक्रमला पुन्हा जीवंत करण्यासाठी सगळी ताकद पणाला लावली आहे. आता या अभियानामध्ये जगातील सर्वात मोठी अवकाश संशोधन संस्था नासा (NASA)देखील सहभागी झाली आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या म्हणण्यानुसार नासाही लँडर विक्रमला संदेश पाठवत आहे. परंतु आतापर्यंत हा संवाद एकतर्फी होता. म्हणजेच लँडर विक्रमकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही. नासा पाठवत आहे मेसेज नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने (NASA/JPL) रेडिओ फ्रिक्वेन्सी लाँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी पाठवली आहे. डेप स्पेस नेटवर्क (DSN) च्या माध्यमातून नासा हा प्रयत्न करत आहे. स्कॉट टिले या अमेरिकन अंतराळवीरांनीही याची माहिती दिली आहे की, नासाने कॅलिफोर्नियास्थित डीएसएन स्टेशनवरून लँडर विक्रमला रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली आहे. त्याने सिग्नल रेकॉर्डकरून ट्विटरवरही हे शेअर केलं आहे. नासाने केलं इस्त्रोचं कौतुक नासाने नुकतंच भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या (इस्रो) चांद्रयान -2 अभियानाचे कौतुक केलं होतं. नासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, ‘अंतराळात संशोधन करणं एक कठीण काम आहे. चांद्रयान -2 मिशनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नांचं आम्हाला अतिशय कौतुक आहे. ’ इतर बातम्या - अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण! अडचणीत आहे चांद्रयान-2 मिशन
#DSN 24 beams ~12KW of RF at the #Moon in hopes of stimulating #Chandrayaan2's lander #VikramLander into communicating with home. Here's a eerie recording of the searcher's signal reflected off the Moon and back to Earth via EME (Earth Moon Earth) on 2103.7MHz. pic.twitter.com/SgOtaIsSYh
— Scott Tilley 🇺🇦 (@coastal8049) September 10, 2019
शनिवारी चांद्रयान 2 मिशनच्या लँडरशी संपर्क तुटला. त्यानंतर 6 दिवस उलटून गेले. परंतु आतापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागातून कोणतीही माहिती आलेली नाही. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी वैज्ञानिकांकडे अवघ्या 9 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 21 सप्टेंबरपर्यंत ते लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात. यानंतर ‘लूनर नाइट’ सुरू होईल. जिथे गोष्टी पूर्णपणे बदलतील. त्यानंतर विक्रमला केवळ 14 दिवस सूर्यप्रकाश मिळेल. इतर बातम्या - स्पा सेंटरमध्ये महिला आयोगाची धाड, एका खोलीत 3 ग्राहक 4 मुली आणि आढळले कंडोम! चांद्रयान 2: ‘विक्रम’शी संपर्क करण्याची अखेरची होप; X-Band कमाल करणार का? चांद्रयान 2चा लँडर विक्रम (Vikram) चंद्राच्या भूमीवर उतरला खरा पण त्याचे सॉफ्ट लँन्डिंग ऐवजी हार्ड लँन्डिंग झाले आणि संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रमशी संपर्क करण्याचे ISROचे प्रयत्न सुरु आहेत. ISROच्या या प्रयत्नांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रभूमीवर विक्रमचा ठाव ठिकाणी लागल्यानंतर त्याच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत प्रयत्नांना यश आले नसले तरी ISROच्या आशा आता केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून आहेत. इतर बातम्या - उदयनराजेंचं भाजप प्रवेशावर काय ठरलं?, तातडीने घेणार शरद पवारांची भेट लँडर विक्रमशी पुन्हा संपर्क करण्याचा एकच मार्ग आता शिल्लक आहे आणि तो म्हणजे एक्स बँड (X-Band) होय. चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित एका शास्त्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, असे काही मार्ग शिल्लक आहेत ज्यामुळे विक्रमशी पुन्हा संपर्क करता येऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे X-Band होय. X-Band आणि ग्राऊंड स्टेशनचा संपर्क होऊ शकतो. सर्वसाधारणपणे याचा वापर रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि कम्यूटर नेटवर्कसाठी केला जातो. SPECIAL REPORT: लातूरमधील भाजपच्या गटबाजीचा फायदा राष्ट्रवादीला?