मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Ahmednagar Farmer : मुख्यमंत्री महोदय, शेती करताय तर शेतकऱ्यांचंही ऐका, गुंठ्याला मिळाले फक्त 5 रुपये!

Ahmednagar Farmer : मुख्यमंत्री महोदय, शेती करताय तर शेतकऱ्यांचंही ऐका, गुंठ्याला मिळाले फक्त 5 रुपये!

राज्यातील शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करत असताना आता सुलतानी संकटानेही पुरता मोडकळीस आला आहे.

राज्यातील शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करत असताना आता सुलतानी संकटानेही पुरता मोडकळीस आला आहे.

राज्यातील शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करत असताना आता सुलतानी संकटानेही पुरता मोडकळीस आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India

राहाता/अहमदनगर, 02 नोव्हेंबर : राज्यातील शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करत असताना आता सुलतानी संकटानेही पुरता मोडकळीस आला आहे. राहाता तालुक्यातील शेतकरी बाबुराव गमे यांनी आपल्या साडेसहा एकरावरील सोयाबिनसाठी उतरवलेल्या विम्याच्या नुकसान भरपाई पोटी गुंठ्याला अवघे पाच रूपये विमा कंपनीने दिले आहे. दरम्यान यावर सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने विमा कंपन्या आपला मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शेतकरी नाराज झाला आहे.

विमा कंपन्या शेतकऱ्यांची चेष्टा करत असून सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. केलवड येथील बाबुराव गमे यांनी 260 गुंठे जमीनीवर असलेल्या सोयाबीनसाठी तीन हजार रूपये विमा भरला होता. अतिवृष्टीने 100 टक्के नुकसान झालेले असताना विमा कंपनीने अवघे 1406 रूपये म्हणजे गुंठ्याला अवघे पाच रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली आहे. अनेकांना तर काहीच नुकसान भरपाई मिळाली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

हे ही वाचा : Video : बहरलेल्या द्राक्ष बागेची बोली लागली, भावही ठरला! पण रात्रीत…

पीक गेल्याच्या भितीने शेतकऱ्याची आत्महत्या

खरिपात लागवडीखालील धान पिक पुराच्या पाण्याने नष्ट झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने नायलॉनच्या दोरीने गळफांस घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथील नर्सरी परिसरात उघडकीस आली आहे. सिताराम महादेव शेंडे (वय 65) राहणार भागडी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान सिताराम यांची भागडी ते मांढळ मार्गावरील नाल्यानजीक जवळपास दीड एकर शेतजमीन आहे. या शेतजमीनीत पिडीत शेतकऱ्याने खरिपाच्या सुमारास धान पिकाची लागवड केली होती. मात्र खरिपाच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पावसासह तब्बल तीनदा चुलबंद नदीसह नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यात पीडित शेतकऱ्याची शेती नाल्याच्या बाजूला असल्याने पुराचे पाणी शेतकऱ्याच्या पिकांत जमा झाल्याने शेतकऱ्याचे संपूर्ण पिक नष्ट झाले होते.

हे ही वाचा : Video : तरुणानं उभारलं देशातील पहिलं जनावरांचं क्वारंटाईन सेंटर, लम्पीवर देतोय मोफत उपचार

लागवडीचा साधा खर्च निघाला नसल्याने पिडीत शेतकरी मागील काही दिवसांपासून त्रस्त असल्याने अखेर चिचोली येथील नर्सरीतील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांना व लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविला. या घटनेत स्थानिक लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Farmer, Farmer protest