Home /News /news /

राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, केंद्र शासनाने दिला महत्त्वाचा निर्णय

राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, केंद्र शासनाने दिला महत्त्वाचा निर्णय

यंदा मक्याचं पीक चांगलं आलं आहे त्यात सरकारच्या या निर्णयामुळे बळीराजा सुखावला आहे.

मनमाड, 25 जून : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्र शासनानं मका खरेदीसाठी 15 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्याबरोबरच खरेदीची मर्यादादेखील 25 हजार मेट्रिक टन वरून वाढवून 65 हजार मेट्रिक टन इतकी केली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा मक्याचं पीक चांगलं आलं आहे त्यात सरकारच्या या निर्णयामुळे बळीराजा सुखावला आहे. या अगोदर केंद्र शासनाने आधारभूत किमतींवर मका खरेदी करण्याची मर्यादा 25 हजार मेट्रिक टन ठेवली होती. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर मका खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र, यंदा मक्याचे मोठ्या प्रमाणात पीक आले असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे मका पडून होता. खरेदी बंद झाल्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले होते. महाराष्ट्राच्या आणखी एका पुत्राला वीरमरण, दोन जवानांचा जीव वाचवताना झाले शहीद अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र शासनाला पत्र लिहिले होते तर दिंडोरीच्या भाजपा खासदार डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी संपर्क साधून मका खरेदीची मुदत आणि मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. हैदराबाद बलात्कारानंतर पुन्हा हादरला देश, मुलीने विरोध केला म्हणून जिवंत जाळलं दरम्यान, खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पण, वर्धा जिल्ह्यात सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या गोवींदपूर इथल्या शेतकरी शीतल चौधरी यांनी 60 एकरात सोयाबीनची लागवड केली. त्याकरता पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खत, लागवडीपर्यंत जवळपास साडेसहा लाख रुपयांच्या घरात खर्चही केला. पण, सोयाबीनचं न उगवल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. Covid-19 : गेल्या 24 तासांत कोरोना वाढला की कमी झाला? पाहा लेटेस्ट आकडेवारी बहुतांश सोयाबीन कुजलं असून काहीला बुरशी चढली आहे. त्यामुळं सोयाबीन उगवण्याची शक्यता मावळली आहे. या नुकसानीची मदत करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Farmer

पुढील बातम्या