पुण्यात बनावट नोटा बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा बघून बँक अधिकारीही चक्रावले

पुण्यात बनावट नोटा बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा बघून बँक अधिकारीही चक्रावले

बनावट नोटा आता चलनातही आल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 26 ऑगस्ट: पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी छापलेल्या बनावट नोटा या खऱ्या नोटाच्या तोडीच्या आहेत. त्यामुळे या नोटा बघून बँकेचे अधिकारीही चक्रावले आहेत.

हेही वाचा...तरुणाची निर्घृण हत्या, घरात घुसून चाकूनं केले सपासप वार, नंतर झाडली गोळी

कुठे आणि कसा सुरू होता बनावट नोटांचा छापखाना...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमधील चिखली घरकुल परिसरात बनावट नोटांचा छापखाना सुरू होता. आरोपी मागील काही दिवसांपासून येथे 2000 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा छापत होते. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी सापळा रचून या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे बारीक नजरेने बघितल्या तर या नकली आहेत की असली हे आपल्यालाही कळणार नाहीत, इतक्या त्या हुबेहूब आहेत.

छापल्या 6 लाख रुपयांच्या बनावट नोटा, पण...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी प्रिंटरच्या मदतीनं 2000 रुपयांच्या सुमारे 6 लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्या. त्यातील एक लाख रुपयांच्या बनावट नोटा विक्री केल्या. या नोटा आता चलनातही आल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 4 लाख रुपयांच्या नोटांची छपाई व्यवस्थीत न झाल्याने त्या आरोपीना विकता आल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

मालेगाव कनेक्शन...

या प्रकरणी पिंपरी चिंचवड परिसरातील चार आरोपींना पोलिसांना आधी अटक केली होती. मात्र अटक करण्यात आलेले चौघेही अल्पशिक्षित असल्याने या रॅकेटचा खरा सूत्रधार दुसराच कुणीतरी असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तपासाची गती वाढवत मुंबईतून खलील शेख आणि मालेगावातून (नाशिक) अख्तर इकबाल अकबर मिर्झा नामक आरोपीला अटक केली.

हेही वाचा...VIDEO: वाद घातला म्हणून महिलेनं आधी वॉचमनच्या कानशिलात लगावली मग चप्पलेनं मारलं

अभिषेक प्रदीप कटारिया (वय-19), ओंकार शशिकांत जाधव (वय-19), सुरेश भगवान पाटोळे (वय- 40), प्रमोद अमृत गायकवाड (वय- 33), अख्तर इकबाल अकबर मिर्झा (वय-57), खालील अहमद अब्दुल हमीद अन्सारी (वय- 40), नयूम रहीहमसाहेब पठाण (वय-33) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2020, 2:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading