Home /News /news /

वीजबिल थकबाकीदारांना ऊर्जामंत्र्यांचा शॉक; अजित पवारांच्या आश्वासनाला दिली बगल

वीजबिल थकबाकीदारांना ऊर्जामंत्र्यांचा शॉक; अजित पवारांच्या आश्वासनाला दिली बगल

ऊर्जामंत्र्यांनी वीज तोडणीसंदर्भात निवेदन काढले असून यानुसार थकबाकीदारांवर वीज तोडणीची टांगती तलवार राहणार आहे.

    मुंबई, 10 मार्च : 02 मार्च, 2021 रोजी विधान सभेत झालेल्या चर्चेत महावितरणाद्वारे वीज ग्राहकांची जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या आधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांच्या आश्वासनाला बगल देत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. (The state government lifted the moratorium on arrears of electricity bills) ऊर्जामंत्र्यांनी वीज तोडणीसंदर्भात निवेदन काढले असून यानुसार थकबाकीदारांवर वीज तोडणीची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळे आतापर्यंत वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांना मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारने थकबाकीदारांच्या वीजबिल तोडणीवरील स्थगिती उठवली आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात 22 मार्च, 2020 पासून लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे मार्च 2020 ते जून 2020 या कालावधीत कोरोनाचे निर्बंध अत्यंत कडक राबविण्यात आल्याने या कालावधीतील वीज देयके मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार मागील 3 महिन्याच्या सरासरीवर आधारीत वीज देयके देण्यात आली होती. हे ही वाचा-पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की.., अजित पवारांचे सूचक विधान राज्यातील सुमारे 2.50 कोटी घरगुती ग्राहकांपैकी 6 लाख 94 हजार इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 99 टक्के तक्रारींचे समाधानकारक निरसन करण्यात आले. याव्यतिरिक्त ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणाद्वारे विविध सवलती व उपायोजना करण्यात आल्या. दरम्यान 02 मार्च, 2021 रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठविण्यात आली आहे. याबाबत ऊर्जामंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, सद्य:स्थितीत केंद्र शासनाकडून शासकीय वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण व परवानामुक्त (delicensing)  करण्याचे धोरण असल्याचे दिसून येत आहे. महवितरणची थकबाकी जर अशीच वाढत राहीली तर ते महावितरणच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपआपल्या कार्य क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहीत करुन महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरुन महावितरण ही ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीज सेवा सक्षमपणे देऊ शकेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ajit pawar, Mumbai, State Electricity

    पुढील बातम्या