Home /News /viral /

VIDEO : शेतकऱ्यानं वानराच्या पिल्लाला दिलं जीवदान, जाळ्यातून अशी केली सुटका

VIDEO : शेतकऱ्यानं वानराच्या पिल्लाला दिलं जीवदान, जाळ्यातून अशी केली सुटका

पिल्लाची जाळ्यातून सुटका करण्यासाठी आईचा जीव टांगणीला लागला आहे.

    मुंबई, 14 जून : अनेकदा आपण प्राण्यांचे गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पाहातो. नुकसात अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये वानराचं पिल्लू जाळ्यात अडकलं आहे आणि त्याची सुटका करण्यासाठी आईचा जीव टांगणीला लागला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता वानराचं पिल्लू जाळ्यात अडकल्यानंतर स्थानिकांनी तिथे गर्दी केली. मात्र शेतकऱ्यानं मोठ्या धाडसानं या वानराच्या पिल्ला जीवदान देत जाळ्यातून सुटका केली. पिल्लू जाळ्यातून सुटल्यानंतर आईला बिलगले आणि आईचा जीवही भांड्यात पडला. या शेतकऱ्यानं माकडाचा कसा जीव वाचवला हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2019 मधील असल्याची माहिती मिळत आहे. या शेतकऱ्यानं माणुसकी दाखवत वानराचा पिल्लाचा जीव वाचवल्यानं पुन्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पुन्हा शेअर होताच या व्हिडीओला 3 हजारहून अधिक लाईक्स आणि 900 हून अधिक रिट्वीट करण्यात आले आहेत. आतापर्यंत 44 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या शेतकऱ्याचं युझर्सनी तुफान कौतुक केलं आहे. हे वाचा-पार्कात आलं भूत आणि करू लागलं जिम? फिटनेस फ्रिक भुताचा VIDEO VIRAL हे वाचा-बिबट्याला थंडी लागली, तर व्यक्तीने लहान बाळासारखं घेतलं चादरीत VIDEO VIRAL संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या