मुंबई, 22 जानेवारी : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरात नेहमीच पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. बरेच लोक डिहायड्रेशनचा संबंध फक्त उन्हाळ्याच्या हंगामाशी जोडतात. परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हिवाळ्यातही शरीर डिहायड्रेट होऊ शकते. उन्हाळ्याच्या महिन्यांच्या तुलनेत आपल्याला हिवाळयात वारंवार तहान लागत नाही.
परंतु कधी कधी नकळत आपण खूप कमी प्रमाणात पाणी पितो. पाणी पिण्याची गरज प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. परंतु प्रत्येक व्यक्तीला हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज सरासरी 3.7 लिटर किंवा त्यापेक्षा थोडे जास्त पाणी पिण्याची गरज असते. मात्र हे आपल्या सभोवतालचे वातावरण आणि आपली ऍक्टिव्हिटी लेव्हल यासारख्या घटकांवर देखील अवलंबून असते.
Control Blood Sugar : ब्लड शुगर कायम राहील नियंत्रित, फक्त रात्री करा हे काम
जास्त काळ पाणी न प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. तुमचे शरीर डिहायड्रेट झाले आहे हे काही लक्षणांद्वारे कळू शकते.
सतत भूक लागणे : पोटभर जेवल्यानंतरही भूक लागणे हे डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे आपले शरीर आपत्कालीन स्थितीत येते आणि यकृतामध्ये ग्लायकोजेन धारण करणे सुरू होते, ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते.
लघवीचा रंग बदलणे : शरीरात पाण्याची कमतरता असण्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवीचा रंग पिवळा होणे. जेव्हा शरीरातील द्रवपदार्थाची पातळी कमी होऊ लागते तेव्हा मूत्रपिंड जास्तीत जास्त पाणी वाचवण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे मूत्र अधिक कॉन्सन्ट्रेटेड आणि गडद रंगाचे होते.
दुर्गंधी : श्वासाची दुर्गंधी हे शरीरात पाण्याच्या कमतरतेचे आणखी एक सामान्य लक्षण आहे. जर आपल्या तोंडात पुरेशा प्रमाणात लाळ असेल तर ते बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करते. परंतु कमी पाणी प्यायल्याने लाळेची निर्मिती देखील कमी होते.
रोज सकाळी कॉफी पिता? तुमची ही सवय आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम
डोकेदुखी : शरीरात द्रवपदार्थ कमी असल्यास शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. रक्तप्रवाह मंदावल्याने शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मेंदूला कमी ऑक्सिजन मिळाल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter