मुंबई, 24 फेब्रुवारी : बिग बॉस 13 (Bigg Boss 13) संपल्यानंतर सुद्धा यामधील काही स्पर्धक चर्चेमध्ये आहेत. यामध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती, कंटेस्टंट माहिरा शर्मा (Mahira Sharma) हिची. सुरूवातली बिग बॉसच्या फायनल एपिसोडमध्ये माहिराने घातलेल्या ड्रेसमुळे ती ट्रोल झाली होती. आलिया भट्टने आयफामध्ये घातलेल्या ड्रेससाखाच पेहराव माहिराने केल्यामुळे ती ट्रोल झाली होती. आता माहिराला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (DPIFF) पुरस्कारावरून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारणही तसंच आहे, माहिरा शर्मावर दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं बनावट प्रशस्तीपत्रक बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. DPIFFच्या अधिकृत टीमकडून हा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करून माहिरा शर्मावर बनावट प्रशस्तीपत्रक बनवल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा- अरे देवा! मलायकानं फक्त घातला शर्ट? VIRAL फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या अश्लील कमेंट ) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा 2020 नुकताच मुंबईत पार पडला. यामध्ये चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. बिग बॉस 13 ची कंटेस्टंट माहिरा शर्माला देखील DPIFF मध्ये पुरस्कार मिळाल्याच्या चर्चांना यावेळी उधाण आलं होतं. ‘मोस्ट फॅशनेबल कंटेस्टंट ऑफ बिग बॉस 13’ या टायटलखाली तिला पुरस्कार मिळाल्याचा दावा माहिराने केला होता. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबाबत तिने पोस्ट शेअर केल्याचं DPIFF ने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
DPIFF ने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानुसार माहिराला असा कोणताच पुरस्कार मिळाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. DPIFF च्या अधिकृत टीमने याबाबत पत्रक शेअर केल्यामुळे माहिराचा खोटेपणा उघड झाल्याचं बोललं जात आहे.
माहिराची ही वर्तवणूक चुकीची असल्याचं सांगत DPIFF ने सूचनापत्रक जारी केलं आहे. चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं कृत्य केल्याचा आरोप DPIFF ने केला आहे. माहिराने 2 दिवसांमध्ये जाहीर माफी मागावी अशी मागणी DPIFFकडून करण्यात आली आहे. असं न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही माहिराला देण्यात आला आहे. माहिराने यावर कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही. यावर माहिरा काय उत्तर देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

)







