मुंबई, 24 फेब्रुवारी : बोल्ड अंदाज आणि धमाकेदार डान्स यामुळे प्रसिद्ध असणारी मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते. याआधीही अर्जून कपूरबरोबर केलेलं हॉट फोटोशूट असुद्या किंवा तिने शेअर केलेली योगा पोज, मलायकाने नेहमीच सोशल मीडियावर प्रेक्षकांच अटेंशन मिळवलं आहे. आता पुन्हा मलायकाचा रिव्हिलींग फोटो समोर आला आहे, ज्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मलायका बऱ्याचदा बोल्ड लूकमध्ये दिसते, मात्र यावेळी ती शर्ट ड्रेस घातलेला फोटो व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सनी यावर तिला खूप वाईट पद्धतीने ट्रोल केलं आहे. खूप वाईट कमेंट्स मलायकाच्या या लूकवर आल्या आहेत.
मलायकाची बहिण अमृता अरोराच्या घराबाहेरील मलायकाचे शर्ट ड्रेसमधील हे फोटो व्हायरल होत आहेत. मानव मंगलानीने आपल्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या शर्ट ड्रेसवर मलायकाने हाय बूट्स आणि हॅट घातली आहे. मलायकाचा हा लूक पाहून तिचे फॅन्स काहीसे नाराज झाले आहेत. तिचा लूक न आवडल्यामुळे अनेकांनी त्यावर अत्यंत वाईट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने मलायकाला विचारलं की, ‘पँट घालायल विसरलीस का?’ तर एका युजरने मलायकाला तिच्या वयावरून ट्रोल केलं आहे. ‘मलायकाच्या चेहऱ्यावरून तिचं वाढतं वय दिसू लागलं आहे’, अशाप्रकारच्या कमेंट्स करत अनेकांनी मलायकाच्या लूकबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मलायका आपल्या सोशल मीडियावर हॉट अंदाजातील फोटो नेहमी शेअर करत असते. नुकताच तिचा रेड हॉट साडीतील फोटो व्हायरल झाला होता.

)







