मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बडा घर पोकळ वासा; पुण्यात 1 किलो सोन्यासाठी उच्च शिक्षित विवाहितेचा अमानुष छळ

बडा घर पोकळ वासा; पुण्यात 1 किलो सोन्यासाठी उच्च शिक्षित विवाहितेचा अमानुष छळ

Crime in Pune: माहेरून 1 किलो सोनं आणण्यासाठी पुण्यातील उच्च शिक्षित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime in Pune: माहेरून 1 किलो सोनं आणण्यासाठी पुण्यातील उच्च शिक्षित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime in Pune: माहेरून 1 किलो सोनं आणण्यासाठी पुण्यातील उच्च शिक्षित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे, 01 सप्टेंबर: हुंडा घेणं किंवा देणं हा महाराष्ट्रात कायद्यानं गुन्हा आहे. असं असूनही आपली मुलगी सासरी सुखात राहावी, यासाठी वधूच्या कुटुंबीयांकडून विविध भेटवस्तू किंवा रोख रक्कमेच्या स्वरुपात हुंडा दिला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात हे चित्र जवळपास सर्वच लग्नात दिसतं. उच्च शिक्षित कुटुंबंही याबाबतीत पाठिमागे राहत नाही. अशी एक घटना पुण्यात घडली आहे. याठिकाणी हुंड्यासाठी उच्च शिक्षित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेनं पती, सासू, दीर आणि नणंदेसह सहा जणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-मुंबई: डोक्यावर कुटुंबाचं ओझं अन् मनात नैराश्य;20वर्षीय हतबल तरुणीनं संपवलं जीवन

पीडितेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही  दिवसांपासून पीडितेचा सासरच्या कुटुंबीयांकडून छळ केला जात होता. माहेरून शंभर तोळे सोनं आणि दोन फ्लॅटसाठी पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला होता. सासरच्या या मागणीला कंटाळून पीडित महिलेनं बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-काळोखात बॅटरी चमकल्याचं दिसताच शेतकऱ्यानं घेतला गळफास; हृदय हेलावून टाकणारी घटना

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, आशिष भालचंद्र ढोणे, रेखा भालचंद्र ढोणे, संग्राम भालचंद्र ढोणे, तन्वी संग्राम ढोणे (सर्व राहणार बिबवेवाडी) निलिमा रविराज जाधव आणि रविराज रावसाहेब जाधव (दोघंही राहणार शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहेत. तर राजनंदिनी आशिष ढोणे असं फिर्यादी विवाहितेचं नावं आहे. फिर्यादीच्या तक्रारीनंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा  पुढील तपास केला जात आहे.

First published: