Home /News /mumbai /

मुंबई: डोक्यावर कुटुंबाचं ओझं अन् मनात नैराश्य; 20 वर्षीय हतबल तरुणीनं संपवलं जीवन

मुंबई: डोक्यावर कुटुंबाचं ओझं अन् मनात नैराश्य; 20 वर्षीय हतबल तरुणीनं संपवलं जीवन

एका 20 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. (File Photo)

एका 20 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. (File Photo)

Suicide in Mumbai: मुंबईतील वाकोला भागात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 20 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे.

  मुंबई, 01 सप्टेंबर: मुंबईतील (Mumbai) वाकोला भागात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 20 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, साडीनं गळफास घेत आत्महत्या (20 Years old woman commits suicide) केली आहे. कुटुंबीय घरी परत येताच घरात 20 वर्षीय मुलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला आहे. याप्रकरणी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकोला पोलीस करत आहेत. प्रीतीदेवी गिरीजा असं आत्महत्या करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. तिने सोमवारी दुपारी घरात कुणी नसताना साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. आर्थिक चणचणीमुळे नैराश्य आल्यानं तिनं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. हेही वाचा-‘काळ्या चिमणीची राख’ तिच्यावर टाकणं पडलं भारी; तरुणाचा खिसाच झाला खाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय मृत प्रीतीदेवी ही एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. घरात आई वडील आणि दोन भावंड असा परिवार आहे. तिच्याच पगारातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू होता. कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांची स्थिती आणखीच बिकट बनत चालली होती. त्यामुळे कुटुंबाला जगवण्याचं आर्थिक ओझं मृत मुलीच्या खांद्यावरचं होतं. आर्थिक चणचणीमुळे मृत प्रीतीदेवी मागील काही दिवसांपासून नैराश्यात होती. ती फार कुणाशी बोलत नसायची. हेही वाचा-सेम टीशर्ट घातल्यानं निष्पाप तरुणाचा गेला जीव; भयंकर कृत्यानं मुंबई हादरली घरच्या बिकट परिस्थितीमुळे नैराश्यानं तिच्या मनात घर केलं होतं. यातूनच सोमवारी तिने आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कुटुंबीय घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना समोर येताच परिसरात एक खळबळ उडाली आहे. घरातील एकुलत्या एक कर्त्या मुलीनं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Mumbai, Suicide

  पुढील बातम्या