जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अस्वस्थ वाटताच जमिनीवर बसली महिला; मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी श्वानाची धडपड, भावुक करणारा VIDEO

अस्वस्थ वाटताच जमिनीवर बसली महिला; मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी श्वानाची धडपड, भावुक करणारा VIDEO

अस्वस्थ वाटताच जमिनीवर बसली महिला; मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी श्वानाची धडपड, भावुक करणारा VIDEO

केटी नावाच्या महिलेला POTS नावाची कंडीशन आहे ज्यामध्ये ती बराच वेळ उभी राहिल्यास तिच्या हृदयाचे ठोके अचानक वाढतात. जेव्हा तिच्यासोबत असं घडतं तेव्हा तिचा सर्व्हिस डॉग लगेच मदतीसाठी पुढे येतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 09 एप्रिल : कुत्रे हे माणसांचे सर्वात चांगले मित्र असतात. दोघांचं नातं इतकं खास आहे, की दोघेही एकमेकांसाठी काहीही करू शकतात. पण या नात्यात कुत्रे अधिक निष्ठावान आणि निस्वार्थी असतात. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या मालकाकडून काहीही नको असतं. गरज भासल्यास ते मालकासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असंच एक दृश्य पाहायला मिळतं. यात एका कुत्र्याने आपल्या मालकिणीचा जीव वाचवला. नशीब म्हणावं की चमत्कार! तरुणाने यमराजालाही दिला चकवा; 10 सेकंदात 2 वेळा मृत्यूवर मात; पाहा VIDEO अलीकडेच @yourpositivenews या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक कुत्रा आपल्या मालकिणीचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे, की केटी नावाच्या महिलेला POTS नावाची कंडीशन आहे ज्यामध्ये ती बराच वेळ उभी राहिल्यास तिच्या हृदयाचे ठोके अचानक वाढतात. जेव्हा तिच्यासोबत असं घडतं तेव्हा तिचा सर्व्हिस डॉग लगेच मदतीसाठी पुढे येतो.

जाहिरात

या व्हिडिओमध्येही असंच दृश्य पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये ती महिला घरातील कामात गुंतलेली असते जेव्हा तिचा कुत्रा तिथे येतो. त्याला समजतं की तिची तब्येत बिघडली आहे. तो जबरदस्तीने महिलेला खाली बसवतो आणि नंतर तिचा फोन आणतो. त्यानंतर तो काउंटरवर चढून तिचं औषध काढतो आणि शेवटी फ्रीजमधून पाणी काढून त्या महिलेच्या हातात देतो, यानंतर तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. या व्हिडिओला जवळपास 6 लाख लाइक्स मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलं, की तो कुत्रा नाही, देवदूत आहे. तर दुसऱ्याने म्हटलं की त्याचा कुत्रा त्याच्यासाठी चेंडूही आणत नाही. आणखी एकाने म्हटलं, की कुत्रे खरोखरच कमाल असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात