जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पत्नीला मोबाइलवरच तिहेरी तलाक!

गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पत्नीला मोबाइलवरच तिहेरी तलाक!

गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पत्नीला मोबाइलवरच तिहेरी तलाक!

पत्नीला मोबाइलवरून तिहेरी तलाक दिल्याची संतापजनक घटना समोर

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 28 ऑगस्ट: गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण असा तगादा लावणाऱ्या पतीनं अखेर आपल्या पत्नीला मोबाइलवरून तिहेरी तलाक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पीडितेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभान आजम खान (रा. समरुबाग) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा… राष्ट्रवादीच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बोगस; शिवसेना नेत्याच्या पुत्राचा गंभीर आरोप आझाद नगर येथील पीडित 21 वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक परंपरेप्रमाणे निकाह झाला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर पीडितेला पती व तिची नणंद हुस्नतारा ही शिवीगाळ करून मारहाण करीत होते.  तर आरोपी पती सुभान हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत होता. मात्र, पीडितेनं त्रास सहन केल्यानंतरही पीडित महिलेने चार वर्षे आपला संसार टिकवून ठेवला होता. परंतु तलाकपूर्वी आरोपी सुभान याने मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असा पत्नीकडे तगादा लावला होता. पत्नी माहेरहून पैसे आणण्यास समर्थ ठरल्याने पीडितेला पती व नणंद या दोघांनी बेदम मारहाण करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ  केला. शिवाय 24 ऑगस्ट रोजी रात्री 11 च्या सुमाराला तिच्या मोबाईलवर संपर्क करून तिला शिवीगाळ करीत मोबाईलवरूनच ततिला तिहेरी तलाक देऊन विवाह बंधनातून मुक्त केल्याचं सांगितले. त्यामुळे पीडित विवाहितेला मानसिक धक्काच बसला. हेही वाचा… देवेंद्र फडणवीस आणि आपण पुन्हा एकत्र का आलो? अजित पवारांनी दिलं उत्तर यांनतर पीडित पत्नीने न्यायाची अपेक्षा करत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 498 A, 323, 504 प्रमाणे  मुस्लिम महिला विवाह हक्क सरंक्षण कायद्याअंतर्गत कलम 4 नुसार तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात