दिल्लीच्या नाल्यांमधून अजूनही वाहत आहेत मृतदेह, आतापर्यंत 8 शव सापडले

दिल्लीच्या नाल्यांमधून अजूनही वाहत आहेत मृतदेह, आतापर्यंत 8 शव सापडले

पोलिसांकडून नाल्यातून आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यासह आतापर्यंत आठ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मार्च : ईशान्य दिल्लीत उफाळलेला हिंसाचार आता थंड झाला असला तरी मृतदेह सापडण्याचं प्रकरण काही थांबत नाही आहे. सोमवारीही भागीरथी विहार नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून नाल्यातून आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यासह आतापर्यंत आठ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

हिंसाचाराच्या वेळी 26 फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार अंकितचा मृतदेह चांदबाग पुलियाजवळील नाल्यातून प्रथम सापडला. दुसर्‍या दिवशी 27 फेब्रुवारीला पोलिसांनी गोकलपुरी व गगन विहार नाल्यांमधून दोन मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर 1 मार्च रोजी गोकुळपुरी, शिव विहार आणि भागीरथी विहार नाल्यांमधून चार मृतदेह सापडले तर सोमवारी पोलिसांनी भागीरथी विहार नाल्यातून एक मृतदेह ताब्यात घेतला.

नाल्यांमधून आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता

दिल्ली हिंसाचारामध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये 8 मृतदेह नाल्यांमध्ये सापडले. सगळ्यांची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नाल्यांमधून सतत मृतदेह सापडत असल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांना शंका आहे की, नाल्यांमुळं अधिक मृतदेह सापडू शकतात. हिंसाचारादरम्यान मृतदेह लपविण्यासाठी लोकांना ठार केलं गेलं असेल आणि नाल्यात फेकलं गेलं असेल असा संशय स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे. मृतदेह कुजल्यानंतर ते वर येत असतील. या नाल्यांची कसून तपासणी केली पाहिजे. मात्र, नाल्यात सापडलेले सर्व मृतदेह हिंसाचाराचे आहेत का? असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यावर आता तपासणी आणि शवविच्छेदनाच्या रिपोर्टनंतरच कळेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

हे वाचा - सुनेचा छळ केल्याप्रकरणी NCPच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

कचऱ्यानं झाकलेले आहेत नाले

जिथे मृतदेह सापडले आहेत तिथल्या हिंसाचारग्रस्त भागातील बहुतेक नाले कचर्‍यानं झाकलेले आहेत. पॉलिथिन आणि कागदाचे तुकडे पाण्यावर तरंगताना दिसतात. नाल्यांमध्ये इतका कचरा आहे की त्यामुळे पाणी दिसत नाही. त्यात आता नाल्यांना साफ करून मृतदेह शोधावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मृतदेह लपवण्यासाठी नाल्यांचा होतो वापर

नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह लपवण्यासाठी कायम नाल्यांचा वापर केला जातो. नाल्यांमधून मृतदेह सापडतच असतात. खरंतर या नाल्यांना लोखंडी जाळीने आणि भक्कम भिंतींनी सुरक्षित केलं आहे पण काही ठिकाणी लोकांनी जाळी आणि भिंतींना तोडून रस्ता बनवला आहे. त्यामुळे त्यात मृतदेह लपवणं सहज सोपं आहे.

हे वाचा - इथं मिळवा बाजार भावापेक्षा स्वस्त सोन, 6 मार्चपर्यंत असणार मोदी सरकारची विशेष योजना

First published: March 3, 2020, 8:12 AM IST
Tags: delhi news

ताज्या बातम्या