जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल विद्या चव्हाण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण आणि कुटुंबातील इतर चार सदस्यांविरूद्ध सुनेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण यांच्यावर पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल विद्या चव्हाण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर पोलिसांचे म्हणणं आहे की, त्यांनी आपल्यावर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध त्यांच्या सुनेने 16 जानेवारी रोजी एफआयआर दाखल केला होता. पण त्याची कोणतीच चौकशी झाली नाही. यावर पोलिसदेखील बोलण्यास तयार नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर भादंवि कलम 498 ए, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात