Home /News /news /

दिल्ली हिंसाचारानंतर सगळ्यात मोठी शोधमोहिम, कुठे आहे पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख?

दिल्ली हिंसाचारानंतर सगळ्यात मोठी शोधमोहिम, कुठे आहे पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख?

पोलिसांवरच बंदूक रोखणाऱ्या लाल रंगाचं टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीची ओळख शाहरुख म्हणून केली आहे. या युवकाची माहिती मिळाल्यापासून, पोलीस आणि विशेष सेल त्याचा शोध घेत आहेत.

    नवी दिल्ली, 03 मार्च : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात दिल्लीत हिंसक निदर्शनं झाली. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारादरम्यान, गोळाबार करणाऱ्या आणि पोलिसांवरच बंदूक रोखणाऱ्या लाल रंगाचं टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीची ओळख शाहरुख म्हणून केली आहे. या युवकाची माहिती मिळाल्यापासून, पोलीस आणि विशेष सेल त्याचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत गोळीबार करणारा तरुण शाहरुख उत्तर प्रदेशात लपून बसल्याची बातमी समोर येत आहे. आतापर्यंत 40 हून अधिक लोक या हिंसाचारामध्ये मारले गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मौजपूर भागात गोळीबार करणारा आरोपी तरुण शाहरुख गोळीबारानंतर पानिपत पोहोचला. त्यानंतर तो कैराना, अमरोहासारख्या पश्चिम उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरात लपला होता. शाहरुखच्या कॉल डिटेलवरून शोध घेणाऱ्या विशेष सेलला माहिती मिळाली आहे की, आरोपी आता उत्तर प्रदेशमधील बरेली इथे लपला आहे. पोलिसांनी यावर तपास केला असता आरोपी युवकाला लवकरच अटक केली जाईल. संबंधित - दिल्लीच्या नाल्यांमधून अजूनही वाहत आहेत मृतदेह, आतापर्यंत 8 शव सापडले हाणामारी दरम्यान दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल ठार गोकुळपुरी इथे दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान, दिल्ली पोलिसांचे हेट कॉन्स्टेबल रतन लाल ठार झाले. रतन लाल हे मूळचे राजस्थानमधील रहिवासी होते. त्यांनी 1998 साली कॉन्स्टेबल म्हणून दिल्ली पोलिसात प्रवेश घेतला. रतनलाल एसीपी / गोकलपुरी कार्यालयात तैनात होते. इथे ते पत्नी आणि 3 मुलांसमवेत राहत होते. दिल्लीच्या नाल्यांमधून अजूनही वाहत आहेत मृतदेह, आतापर्यंत 8 शव सापडले शान्य दिल्लीत उफाळलेला हिंसाचार आता थंड झाला असला तरी मृतदेह सापडण्याचं प्रकरण काही थांबत नाही आहे. सोमवारीही भागीरथी विहार नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून नाल्यातून आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्यासह आतापर्यंत आठ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. हे वाचा - सुनेचा छळ केल्याप्रकरणी NCPच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल हिंसाचाराच्या वेळी 26 फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार अंकितचा मृतदेह चांदबाग पुलियाजवळील नाल्यातून प्रथम सापडला. दुसर्‍या दिवशी 27 फेब्रुवारीला पोलिसांनी गोकलपुरी व गगन विहार नाल्यांमधून दोन मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर 1 मार्च रोजी गोकुळपुरी, शिव विहार आणि भागीरथी विहार नाल्यांमधून चार मृतदेह सापडले तर सोमवारी पोलिसांनी भागीरथी विहार नाल्यातून एक मृतदेह ताब्यात घेतला.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Delhi news

    पुढील बातम्या