MCD चेअरमनचा धक्कादायक दावा, दिल्लीमध्ये लपवले जात आहेत कोरोना मृतांचे आकडे

MCD चेअरमनचा धक्कादायक दावा, दिल्लीमध्ये लपवले जात आहेत कोरोना मृतांचे आकडे

आकडेवारीनुसार, कोव्हिड-19 मुळे आतापर्यंत 1114 मृत्यू लपवले गेले आहेत. 984 अशा मृत्यूचा दिल्ली सरकार दावा करत आहे. पण हा खोटा असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

प्रियंका कांडपाल, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 11 जून : नॉर्थ एमसीडी (MCD) च्या स्थायी समिती अध्यक्षांनी मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर स्मशानभूमी आणि कब्रस्तानमधील कोरोना मृतांची आकडेवारी समोर आणत त्यांनी मोठा आरोपा केला आहे. दिल्लीत कोरोनाच्या मृतांची संख्या लपवली जात असल्यांचं त्यांचं म्हणणं आहे. आकडेवारीनुसार, कोव्हिड-19 मुळे आतापर्यंत 1114 मृत्यू लपवले गेले आहेत. 984 अशा मृत्यूचा दिल्ली सरकार दावा करत आहे. पण हा खोटा असल्याचं सांगण्यात येत आहे.

स्मशानभूमी व कब्रस्कानच्या आकडेवारीवरून दिल्लीत मृतांचा आकडा 2098 असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा खुलासा झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही दिल्लीच्या आकडेवारीवर आपलं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

मुंबईत भयंकर प्रकार, कोरोना रुग्णाचा मृतदेह उघडून मारली मिठी आणि नंतर...

कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या दिल्ली सरकार लपवत असल्याचा आरोप अध्यक्ष जय प्रकाश यांनी केला आहे. कारण, उत्तर एमसीडीमध्ये 976 अंत्यसंस्कार, दक्षिण एमसीडीमध्ये 1080 आणि पूर्व एमसीडीत 42 अंत्यसंस्कार झाले आहेत. पण 984 असा आकडा दिल्ली सरकारने सांगितला आहे. पण स्मशानभूमी आणि कब्रस्तानने सर्व मृतांचे रजिस्टर ठेवलं आहे. यात मृतांचा तपशील आणि त्यांच्या मृत्यूचं कारणही लिहिण्यात आलं आहे. त्यानुसार कोव्हिड- 19 मुळे दिल्लीत 2098 रुग्णांचे निधन झाले आहे.

दिल्लीत आकडेवारी काय म्हणालं आरोग्य मंत्रालय?

दिल्लीमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या दिल्ली सरकार आणि एमसीडीच्या आकड्यांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिव, लव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जे आकडे आम्हाला दिल्ली सरकारकडून मिळतात तेच आम्ही संकलित करतो. त्यामुळे जे आम्हाला दिल्ली सरकारने दिले तेच आम्ही माध्यमांसमोर आणले आहेत.

VIDEO: मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

आरोप दिल्ली सरकार काय म्हणालं ?

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नजर ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने वरिष्ठ डॉक्टरांची डेथ ऑडिट कमिटी स्थापन केली आहे. ती नि: पक्षपातीपणे आपलं काम करत आहे. त्यामुळे समिती ज्या पद्धतीने काम करते त्या प्रकारची चौकशी करता येणार नाही. कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये, आपल्याला एकत्र येऊन लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे.

'निसर्ग'नंतर राजकीय चक्रीवादळ, सरकारच्या पॅकेजमध्ये फडणवीसांनी काढल्या चुका

संपादन - रेणुका धायबर

First published: June 11, 2020, 8:12 PM IST

ताज्या बातम्या