Home /News /mumbai /

पेट्रोलवर नको दारुवर कर वाढवा, मनसेने केली ठाकरे सरकारकडे मागणी

पेट्रोलवर नको दारुवर कर वाढवा, मनसेने केली ठाकरे सरकारकडे मागणी

'देशात पेट्रेल-डिझेलचे दर हे इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. त्यात हा अधिभार नको. त्यामुळे महागाई वाढेल.'

    मुंबई 8 जून:  कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन लावलं गेलं. त्यामुळे सगळीच अर्थव्यवस्था खालावली. सरकारचा महसूल आटला. त्यामुळे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर वरचा व्हॅट 2 रुपयांनी वाढवला होता. सरकारच्या या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा अशी मागणी केला आहे. दारु विक्रीला सरकारने महिनाभरापूर्वीच परवानगी दिली होती. त्यानंतर वाईन शॉप्सवर देशभर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक राज्य सरकारांनी दारुवर भरमसाठ करही लादला होता. तोच धागा पकडत बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केलीय. ते म्हणाले, महसूल तूट भरून काढण्यासाठी राज्यसरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेल वर 2 रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढविला , सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार. इंधनावर अधिभार लादल्याने सगळ्याच गोष्टी महाग होतात. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात आणि महागाई भडकते त्यामुळे असा कर लादू नये अशी मागणही त्यांनी केली आहे. राजेश खन्नांच्या गाण्यावर स्वतःला रोखू शकल्या नाहीत डिंपल, पाहा डान्स Video दरम्यान घरपोच दारु देण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी तीव्र टीका केली होती. घरपोच दारूचा परिणाम म्हणजे घरपोच कोरोंना, घरपोच हिंसा आणि पाच लक्षं मृत्यूच्या स्वरुपात देशाला भोगावा लागणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. शासन व न्यायालयाच्या या भूमिकेला दुरुस्त करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. कोरोना पसरू शकतो या भीतीने अनेक घरपोच सेवा बंद करण्यात आल्या. त्या न्यायाने घरपोच दारू म्हणजे ‘घरपोच कोरोना सेवा’ ठरू शकते. दारू न पिताच सामाजिक अंतराची शिस्त तोडणारी माणसे दारू पोटात व डोक्यात गेल्यावर घरी व अन्यत्र सामाजिक अंतराचे पालन करतील का? आणि भारतात अशी पाच कोटी दारूग्रस्त माणसे आहेत. दोन पाच हजार तबलिगींना दोष देणारे शासन 5 कोटी कोरोना प्रसारक समाजात घरपोच मोकळे सोडणार आहे. धक्कादायक! औरंगाबादेत कोविड सेंटरमधून 2 कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले न्यायालयाला दारू ही नागरिकांची मूलभूत गरज व हक्क वाटतो का असा प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, पुरुष गर्दी करतात ती प्रत्येक सेवा घरपोच सुरू करावी का? दारू च्या नशेत पुरुष घरात बेताल वागू शकतात. ते बघणार्‍या घरातील लहान मुलांवर काय परिणाम होतील?  घरपोच दारू मुळे स्त्रियांवरच्या हिंसेत वाढ होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: MNS, Petrol and diesel price

    पुढील बातम्या