Home /News /entertainment /

राजेश खन्नांच्या गाण्यावर स्वतःला रोखू शकल्या नाहीत डिंपल, पाहा धम्माल डान्स Video

राजेश खन्नांच्या गाण्यावर स्वतःला रोखू शकल्या नाहीत डिंपल, पाहा धम्माल डान्स Video

डिंपल कपाडिया यांचा एक धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 8 जून : बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया आज 63 वा वाढदिवस साजरा करत आहेत. डिंपल नेहमीच त्यांच्या स्टायलिश आणि हटके लुकसाठी ओळखल्या जातात. आज डिंपल फारशा सिनेमात दिसत नसल्या तरी त्यांच्या लोकप्रियतेत मात्र तसूभरही फरक पडलेला नाही. आताही त्यांचा एक धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्या धम्माल डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं राजेश खन्ना यांचं ‘जय जय शिव शंकर’ आणि डिजेवर हे गाणं लागल्यावर डिंपल स्वतःला रोखू शकल्या नाही. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतील गाणं हे राजेश खन्ना यांच्या सिनेमातील आहे. ज्या गाण्याच्या तालावर त्या बेधूंद नाचताना दिसत आहेत. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनी 1973 मध्ये लग्न केलं होतं आणि 1982 मध्ये दोघंही वेगळे झाले. डिंपल यांनी वयाच्या 16 व्या वर्षी ‘बॉबी’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं आणि या सिनेमातील त्यांचा बोल्ड अंदाज खूप चर्चेत राहिला होता.
  सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा त्यांचा व्हिडीओ सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या भाचीच्या म्हणजेच सौदामिनी मट्टूच्या रिसेप्शनमधील आहे. या रिसेप्शन पार्टीमध्ये त्या ‘जय जय शिव शंकर’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे गाणं वाजू लागताच डिंपल त्यावर थिरकू लागल्या. डिंपल कपाडिया बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांनी 'काश (1987)', 'दृष्टि (1990)', 'लेकिन...(1990)' आणि 'रूदाली (1993)' या सारख्या सिनेमात काम केलं होतं. यापैकी रुदालीसाठी डिंपल यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. काही काळापूर्वी रिलीज झालेल्या इरफान खानच्या अंग्रेजी मीडियमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या