नवी दिल्ली, 16 मे : भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) चक्रीवादळ अम्फानबाबत अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं दिसत आहे. येत्या दोन दिवसांत हे वादळाचं रूप घेऊ शकतं असं बोललं जात आहे. पण कमी दाबाचं क्षेत्र कोणत्या गतीने पुढे सरकत आहे याबद्दल अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे वादळ किनाऱ्यावर नेमक्या कोणत्या भागात धडकेल याची माहिती हवामान खात्यानं दिली नाही. जाणून घेऊयात या वादळाशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी ...
1. सद्यस्थिती: हवामान खात्याने सकाळी 8.30 वाजता वादळाविषयी एक अपडेट जारी केला होता. त्यानुसार ओडिशाच्या पारादीपपासून 1060 किमी अंतरावर कमी दाबाचं क्षेत्र आहे. पश्चिम बंगालमधील दिघा किनाऱ्यापासून ते 1310 किमी अंतरावर आहे.
2. पुढील 24 तास असतील धोकादायक: पुढील 12 तासांत हे वादळाचं रूप धारण करू शकतं, तर पुढच्या 24 तासांत ते एका चक्रीवादळाच्या (Severe Cyclonic Storm) रूपात बदलेल. सध्या असा अंदाज वर्तविला जात आहे की 18-20 मे दरम्यान कधीतरी हे वादळ बंगालच्या किनारपट्टीवर आदळेल.
3. ताशी 190 किलोमीटर असू शकतो वेग : 19 मेच्या सकाळपासून ओडिशामध्ये 65 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहू शकतात. वाऱ्याचा वेग सतत वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी, पश्चिम बंगालच्या किनारी भागात वाऱ्याचा वेग 60-70 किमी प्रति ताशी असू शकेल. ज्या दिवशी हे वादळं किनाऱ्यावर आदळेल त्या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी 190 किमी पर्यंत पोहोचू शकतो.
राखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना
4. बर्याच भागात वादळी पावसाला सुरुवात: 16 मे म्हणजे आजपासून अंदमान आणि निकोबार भागात पाऊस सुरू झाला आहे. ओडिशाच्या किनारपट्टी भागातही सोमवारपासून मुसळधार पाऊस पडेल. तर रविवारपासून पश्चिम बंगालमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5. पाच-सहा दिवस खराब हवामानाची चेतावणी: अंदमान, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील पाच-सहा दिवस हवामान खात्याने खराब हवामानाचा इशारा दिला आहे. अंदमान निकोबार बेटं, ओडिशा आणि गंगा नदीच्या पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
6. ओडिशाच्या 12 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा: ओडिशामध्ये वादळाच्या धोक्यापासून बचावासाठी तयारी करण्यात आली आहे. शुक्रवारी समुद्रकिनारी असलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना लोकांसाठी पर्यायी निवारा गृहांची व्यवस्था करण्यास सांगितल आहे.
माऊथ वॉशमुळे मरू शकतो कोरोना विषाणू? काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं
7. वादळाच्या परिस्थितीवर अधिकाऱ्यांचं लक्ष: ओडिशाचे आयुक्त पीके जेना म्हणाले की, मुख्य सचिव असित त्रिपाठी यांच्यासमवेत अनेक अधिकाऱ्यांना वादळाच्या परिस्थितीचा आणि राज्यावरील परिणामांचा आढावा घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
8. बंगालच्या उपसागराकडे वळू शकतं चक्रीवादळ: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचं क्षेत्र उत्तर-उत्तर पूर्व दिशेला फिरत बंगालच्या उपसागरावर वळेल.
9. NDRF आणि फायर ब्रिगेट अलर्टवर: NDRF आणि अग्निशमन दलासह अनेक सुरक्षादलांना धोक्याच्या ठिकाणी तैनात केलं जाऊ शकतं. सगळ्यांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
10. मच्छिमारांना समुद्रात जाण्यावर बंदी: ओडिशा सरकारने असं म्हटलं आहे की, दक्षिणेस आणि त्या बाजूने बंगालची उपसागर आणि अंदमान समुद्राच्या तुलनेत समुद्राची परिस्थिती वेगवान होईल, ज्यामुळे मच्छीमारांना 15 मेपासून दक्षिण व मध्य महासागरात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एक चहाची तलफ आणि वाचलं 24 जणांचं आयुष्य, काही लोकांचा प्रवास ठरला अखेरचासंपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.