जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Cyber Crime : पत्नी गेली माहेरी, पतीनं फेक अकाऊंट बनवत केलं घाणेरडं कृत्य

Cyber Crime : पत्नी गेली माहेरी, पतीनं फेक अकाऊंट बनवत केलं घाणेरडं कृत्य

Cyber Crime : पत्नी गेली माहेरी, पतीनं फेक अकाऊंट बनवत केलं घाणेरडं कृत्य

husband make fake account of wife पती त्या अकाऊंटवरून सर्वांना आक्षेपार्ह फोटो आणि मॅसेज पाठवत होता. त्या अकाऊंटवरून पती अश्लिल चॅटही करत होता. त्यानंतर पतीला आणखी त्रास देण्यासाठी त्यानं अश्लिल चॅट आणि फोटोचे स्क्रीनशॉट पत्नीला पाठवले.

  • -MIN READ
  • Last Updated :

पटियाला, 01 जून : कौटुंबीक वादानंतर पतीवर रुसुन माहेरी राहणाऱ्या महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न भठिंडा (Bhathinda) येथील एकाच्या चांगलाचा अंगलट आला आहे.  या व्यक्तिची पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी राहत होती. पण तिच्या पतीला याचा राग होता. त्यामुळं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पत्नीचे आक्षेपार्ह फोटो (Offensive) आणि मॅसेज पतीनं तिच्या माहेरच्या परिसरातील संबंधित लोकांना पाठवत व्हायरल केले. त्यानंतर पत्नीनं पोलिसांत पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (वाचा- मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; CRPF जवानाने महिलेवर कोयत्याने केले वार ) तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार महिलेचा विवाह मेहराज गावच्या धरमिंदर सिंगबरोबर झाला होता. धरमिंदर यांचा हा दुसरा विवाह होता. सासरचे लोक महिलेबरोबर चांगलं वर्तन करत नव्हते. त्यामुळं पती-पत्नींमध्ये अनेकदा वादही होत होते. त्यामुलं वादाला कंटाळून महिला अखेर माहेरी निघून आली. बऱ्याच दिवसांपासून महिला माहेरी राहत होती. पण तिच्या पतीला हे आवडत नव्हतं. त्यामुळं पत्नीला बदनाम करण्यासाठी पतीनं कारस्थान रचलं. (वाचा- लॉकडाऊनमुळे दिव्यांग मामा झाला बेरोजगार; घरभाडं न दिल्याने भाच्याने केला अ‍ॅसिड ) महिलेच्या पतीनं म्हणजे धरमिंदरनं पत्नीच्या नावाचं खोटं फेसबूक अकाऊंट तयार केलं. त्यानंतर महिलेच्या माहेरी तिच्या आसपास राहणाऱ्यांना पतीनं तिच्या नावां फ्रेड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर पती त्या अकाऊंटवरून सर्वांना आक्षेपार्ह फोटो आणि मॅसेज पाठवत होता. त्या अकाऊंटवरून पती अश्लिल चॅटही करत होता. त्यानंतर पतीला आणखी त्रास देण्यासाठी त्यानं अश्लिल चॅट आणि फोटोचे स्क्रीनशॉट पत्नीला पाठवले. पतीच्या कृत्यानंतर पत्नीनं त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीच्या विरोधात आयटी अॅक्ट 2000 च्या कलम 68 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात