नागपूर, 01 जून: कोरोना संसर्गाच्या (Corona Pandemic) वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन असल्याने अनेकांना आपल्या घराचं किंवा दुकाचं भाडंही देता येत नाही. अशात बेरोजगार दिव्यांग लोकांची परिस्थिती तर आणखीच बिकट बनली आहे. त्यांचा उदरनिर्हावाचा प्रश्न निर्माण झाला असताना घरभाडं देणं कठिण होऊन बसलं आहे.
अशातच घरभाडे न दिल्याने भाडेकरू व्यक्तीवर (Not paid rent) अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घटली आहे. विशेष म्हणजे, भाडेकरू व्यक्ती हा आरोपीचा मामा असून ते दिव्यांग आहेत. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली. हाताला दुसरा कोणताही रोजगारही नाही. यामुळे दिव्यांग मामाने मागील तीन महिन्यापासून घराचं भाडं दिलं नव्हतं. पण घरमालक भाचा वारंवार पैशासाठी तगादा लावत होता. यातूनच रागाच्या भरात आरोपीने भाडेकरू मामावर अॅसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
संबंधित घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तर अॅसिड हल्ला झालेल्या भाडेकरू मामाचं नाव डोमाजी गौरकार असून ते दिव्यांग आहेत. अशात मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचं मागील तीन महिन्यांपासून घराचं भाडं थकीत होतं. नात्याने भाचा लागणारा घरमालक पैशासाठी भाडेकरूकडे वारंवार तगादा लावला होता.
हे ही वाचा-रायगडमधील तरुणीच्या हत्येचं गूढ उलगडलं; प्रियकराने केटामाईन इंजेक्शन देऊन संपवल
मात्र डोमजी गौरकार पैसे देऊ शकले नाही. त्यामुळे दोघांतील वाद वाढत गेला. यातूनच आरोपी भाच्याने रागाच्या भरात हे कृत्य केलं आहे. या अॅसिड हल्ल्यात डोमाजी गौरकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी आरोपी सुदाम खोत याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur