मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोल्हापूर : 2 मिनिटांपूर्वी दरी क्रॉस केली, धावत्या स्कूल बसमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका 

कोल्हापूर : 2 मिनिटांपूर्वी दरी क्रॉस केली, धावत्या स्कूल बसमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका 

चालकाने त्याला इतका त्रास होत असतानाही प्रसंगावधान राखलं आणि विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

कोल्हापूर, 6 सप्टेंबर : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसंगावधान राखत चालकाने बस बाजूला घेतली. यामुळे मोठा अपघात टळला आहे. मात्र या घटनेत चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

स्कूल बस चालवत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने चालकाचा मृत्यू झाला. सतीश कांबळे असं या चालकाचे नाव आहे. पिंपळवाडी येथून भोगावतीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. बस बरगेवाडी इथं आल्यानंतर चालकाला हृदय विकाराचा जोरदार झटका आला. यावेळी बस बाजूला घेतली. यात विद्यार्थ्यांचे जीव वाचवले पण कांबळे यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला.

डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक, कोल्हापुरातील Video

आणखी दोन मिनिटे अगोदर ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता कारण दरी क्रॉस करून बस पुढे आली होती त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा धक्का बसला. चालकाने त्याला इतका त्रास होत असतानाही प्रसंगावधान राखलं आणि विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला.

First published:

Tags: Kolhapur, School bus