जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Pune ATS ची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला घातल्या बेड्या

Pune ATS ची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला घातल्या बेड्या

Representative Image

Representative Image

दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी (Lashkar e taiba) काम करणाऱ्या तरूणाला पुण्यातील दहशतवादी विरोधी पथकानं (Pune ATS) उत्तर प्रदेशात अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 13 जून :  दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी (Lashkar e taiba**)** काम करणाऱ्या तरूणाला पुण्यातील दहशतवादी विरोधी पथकानं (Pune ATS) उत्तर प्रदेशात अटक केली आहे. इमानूल हक (Inamul Haq) असं या तरूणाचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरूणाला एटीएसनं यापूर्वी अटक केली होती. इमानूल त्याच्या संपर्कात होता.  त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोण आहे जुनैद? दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यात यापूर्वी अटक केलेला जुनैद मोहम्मद हा मुळचा बुलडाण्याचा आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 10 वी नापास असलेला जुनैद सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. तो लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. पुण्यातील भवानी पेठेत झालेल्या स्फोटाचं गूढ वाढलं, फ्लॅटमध्ये सापडल्या संशयित वस्तू लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी त्याला पैसे मिळत होते. जम्मू काश्मीरमधून पैसे मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्याने 10 हजार रुपये घेतले होते. दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला जुनैद याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर आठवडाभर चौकशी केल्यानंतर 10 हजार रुपये घेतल्याचं मोहम्मद जुनैद याने मान्य केलं. जुनैद आणि इमानूल हे दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. जुनैदच्या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार पुणे एटीएसनं इमानूलला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात