पुणे, 13 जून: पुण्यातील भवानी पेठ (bhavani peth pune) परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये स्फोट ( blast in a flat in Pune ) झाला. विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे (Pune) पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रशाद मोहम्मद अली शेख असं आहे. रशादकडे चौकशी केल्यानंतर तो कोंढवा परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत लिशा इनकलेव या सोसायटीमध्ये राहत असल्याचं कळाल्यानंतर पुणे पोलीस तिथेही पोहोचले आणि आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली.
Maharashtra School: सुट्टी संपली...! राज्यभरात आजपासून शाळा सुरु
रशाद शेख हा कोण आहे? दोन दोन फ्लॅटमध्ये राहणारा शेख खरंच इलेक्ट्रिक एक वस्तू दुरुस्त करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असेल का? त्याच्या फ्लॅटमध्ये घडलेला स्फोट कशाचा होता? यावर पुणे पोलीस अजूनही काही बोलायला तयार नसल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत चाललं आहे.
दरम्यान ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथून काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Honey shampoo: केसांसाठीही मध आहे उपयोगी; या 3 पद्धतीनं घरच्या घरी तयार करा मधाचा शॅम्पू
स्फोट झालाा तेव्हा बॉम्ब डिटेक्शन पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅटधारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेरींगचे कामे करतो. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचं समोर आलं होतं. शेख हा गेल्या 10 वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली.
राशद हा मुळचा मुंबईतला आहे. तो इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. मात्र तो गेल्या 10 वर्षांपासून याच फ्लॅटमध्ये राहतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Pune, Pune (City/Town/Village)